लोकचळवळ उभारल्यास गावे पाणीदार होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 11:45 PM2018-04-25T23:45:24+5:302018-04-25T23:45:24+5:30
पावसाचे पाणी हे आपल्या हक्काचे पाणी आहे. पण ते टिकवून ठेवण्यासाठी लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे. तेव्हाच दुष्काळ नाहीसा होवून प्रत्येक गाव पाणीदार होईल, असे प्रतिपादन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. चारूलता टोकस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : पावसाचे पाणी हे आपल्या हक्काचे पाणी आहे. पण ते टिकवून ठेवण्यासाठी लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे. तेव्हाच दुष्काळ नाहीसा होवून प्रत्येक गाव पाणीदार होईल, असे प्रतिपादन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. चारूलता टोकस यांनी केले.
पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटर कप स्पर्धेसाठी देवळी तालुक्यातील कविठगावची निवड करण्यात आली आहे. तेथे स्पर्धेला केंद्रस्थानी ठेवून श्रमदानातून जलसंवर्धना संदर्भात विविध कामे केली जात आहेत. हे गाव अॅड. टोकस यांनी गाठून स्वत: श्रमदान केले. यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. श्रमदानाचे अभूतपूर्व कार्य करण्यासाठी गावातील शेकडो नागरिकांचे हात सरसावले आहेत. या श्रमदानामध्ये सहभागी होवून अॅड. चारूलता टोकस यांनी गावकºयांसह प्रत्यक्ष श्रमदान केले. पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेमुळे गावामध्ये श्रमदानाच्या माध्यमातून परिसर पाणीदार करण्यासाठी विविध कामे केली जात आहेत. यावेळी पं.स.सदस्य कल्याण ढोक, सरपंच निला खेडकर, दिनेश धांदे, राजाभाऊ खेडकर, देविदास तिनघसे, लक्ष्मण कांबळे, विकास ढोक, उत्तम वºहाडे, बाभुळकर बोबडे, सचिन बोबडे, अशोक आठबैले, अनंता जोगवे, खोंड, झांजरी आदींनी श्रमदान केले.