विनोबा भावे समाधिस्थळी स्वच्छता अभियान
By admin | Published: October 27, 2015 03:15 AM2015-10-27T03:15:12+5:302015-10-27T03:15:12+5:30
स्माईल पीपल संस्थेकडून पवनार येथील विनोबा भावे समाधी परिसर, मार्ग व धाम नदीपात्राची साफसफाई मोहीम राबविण्यात
वर्धा : स्माईल पीपल संस्थेकडून पवनार येथील विनोबा भावे समाधी परिसर, मार्ग व धाम नदीपात्राची साफसफाई मोहीम राबविण्यात आली. दुर्गा देवी विर्सजनानंतर येथे झालेला कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
संस्थेचे पदाधिकारी व गावातील युवक यांनी नियोजन करुन नदी पात्रामधील फुल, हार असे निर्माल्य गोळा केले. नदीवर आंघोळ करण्याकरिता येणाऱ्या लोकांचे कपडे पात्रात आढळले. ते बाहेर काढून त्याचे विल्हेवाट लावली. स्माईल पिपल्स कडून नागरिकांना नदी व नाल्या स्वच्छ ठवल्या पाहिजे. आपला परिसर स्वच्छ असला तरच आपण निरोगी राहू, असा संदेश दिला. हा विचार प्रत्येकाने आपल्या मनात रुजवायला पाहिजे, कचरा करणे, नदीत कचरा टाकणे बंद करायला हवे, त्यामुळे पर्यावरण समतोल राखण्यास मदत होईल. स्वच्छता मोहिमेस उपस्थित असलेल्या स्माईल पीपल्सच्या पदाधिकारी व सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशाच प्रकारचे उपक्रम जिल्ह्यात राबविण्याचा संकल्प केला.
या प्रकारच्या मोहिमेत जनतेचा सहयोग असण्याची गरज संस्थेचे अध्यक्ष विनोद बन यांनी व्यक्त केली. उपक्रमाला उपाध्यक्ष श्रीकांत वघळे, सचिव सुनिल पिसे, कोषाध्यक्ष अतुल गोळीवाले, सहसचिव सचिन माटे, सदस्य समीर शेख, भरत बम, धनराज भावरकर, रितीक पिसे, आसिफ अली, सुरेश फटिंग, संजय ढवळे, निलेश कुंडेकर, दिपक हर्षे, रुपेश डेहनकर, मोहसिम शेख, शेख शब्बीर आदींनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)