विनोबा गांधीजींचे आध्यात्मिक अधिष्ठान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 05:00 AM2020-09-19T05:00:00+5:302020-09-19T05:00:10+5:30
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आचार्य विनोबा भावे यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महात्मा गांधी फ्यूजी गुरुजी सामाजिक कार्य अध्ययन केंद्राचे निदेशक प्रा. मनोजकुमार, संस्कृती विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. नृपेंद्रप्रसाद मोदी, नंदू गावंडे आणि सायकल प्रवासी सुरजीत यांनी आपले विचार मांडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आचार्य विनोबा भावे यांची आध्यात्मिक दृष्टी यापक होती. त्यांच्यातील आध्यात्मिक शक्तिमुळे महात्मा गांधी त्यांना आपला आध्यात्मिक गुरू मानत असे. विनोबा हे गांधीजींचे आध्यात्मिक अधिष्ठान होते. विनोबाजींनी गीता प्रवचनातून सामान्य लोकांना गीतेचा संदेश सरळ आणि सहज भाषेत समाजवून सांगीतला, असे हिंदी विद्यापीठाचे प्रकुलगुरु प्रा. चंद्रकांत रागीट यांनी सांगितले.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आचार्य विनोबा भावे यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महात्मा गांधी फ्यूजी गुरुजी सामाजिक कार्य अध्ययन केंद्राचे निदेशक प्रा. मनोजकुमार, संस्कृती विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. नृपेंद्रप्रसाद मोदी, नंदू गावंडे आणि सायकल प्रवासी सुरजीत यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शंभु जोशी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. मिथिलेश कुमार यांनी मानले. यावेळी शिक्षकांची उपस्थिती होती.
पवनारात गीताई पाठ
परमधाम आश्रम पवनार येथे आचार्य विनोबा भावे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त प्रविणा देसाई यांनी 'विनोबा चरित्र' या पुस्तकाचे विमोचन तसेच डॉ. प्रसन्न कुमार बंब यांनी संकलित केलेल्या गौरव ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. मयूर महाराज तर्फे गीताई पाठ १८ दिवस करण्यात आले. यावेळी प्रकुलगुरु प्रा. चंद्रकांत रागीट यांची उपस्थिती होती.