गॅस एजन्सीचालकाकडून संचारबंदीचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:00 AM2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:06+5:30

समुद्रपूर-हिंगणघाट मार्गावर वैष्णवी गॅस एजन्सीचे गोदाम आहे. घरपोच सिलिंडर वितरित करणे बंधनकारक असतानाही ग्राहकांना घरपोच सिलिंंडर मिळत नसल्याने ग्राहक सिलिंडर घेण्याकरिता गोदामापुढे गर्दी करीत होते. जमावबंदी असतानाही गर्दी उसळत असल्यामुळे याप्रकरणी १०० क्र मांकावर तक्रार करण्यात आली.

Violation of communication by gas agency operators | गॅस एजन्सीचालकाकडून संचारबंदीचे उल्लंघन

गॅस एजन्सीचालकाकडून संचारबंदीचे उल्लंघन

Next
ठळक मुद्देगुन्हा दाखल : सिलिंडर घेण्यासाठी जमली होती गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : जिल्ह्यात १४४ अंतर्गत जमावबंदी लागू असतानाही येथील वैष्णवी गॅस एजन्सीच्या गोदामात सिलिंडर घेण्याकरिता ग्राहकांची एकच गर्दी उसळत होती. त्यामुळे संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एजन्सीचे संचालक अनिल कामडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समुद्रपूर-हिंगणघाट मार्गावर वैष्णवी गॅस एजन्सीचे गोदाम आहे. घरपोच सिलिंडर वितरित करणे बंधनकारक असतानाही ग्राहकांना घरपोच सिलिंंडर मिळत नसल्याने ग्राहक सिलिंडर घेण्याकरिता गोदामापुढे गर्दी करीत होते. जमावबंदी असतानाही गर्दी उसळत असल्यामुळे याप्रकरणी १०० क्र मांकावर तक्रार करण्यात आली. तक्रारीची दखल घेत तहसीलदार राजू रणवीर, पुरवठा निरिक्षक देसाई व हिंगणघाटचे पुरवठा निरिक्षक टोंग यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांना गर्दी दिसून आल्याने त्यांनी कलम १८८ अंतर्गत जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करीत सदर प्रकरण समुद्रपूर पोलिसांकडे सोपविण्यात आले. त्यांनी एजन्सीचे संचालक अनिल रामभाऊ कामडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंपनीकडून सात दिवसानंतर सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला.
३१ मार्चला सिलिंडर आल्याची माहिती ग्राहकांना मिळताच त्यांची एजन्सीत न येता गोदामापुढे गर्दी केली. प्रत्येक ग्राहकाला सिलिंडर देणे हे आमचे कर्तव्य असल्याने त्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहे. आम्ही कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केले नसल्याचे कामडी यांनी सांगितले.

पुरवठ्याअभावी एजन्सीची होतेय अडचण
लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याचे निर्देश असतानाही गॅस कंपनीकडून एजंन्सीला वेळेत सिलिंडरचा पुरवठा होत नाही. त्यामुळे एजन्सीकडून ग्राहकांपर्यंत सिलिंडर पोहोचण्यास विलंब होत आहे. आठवड्याभरानंतर सिलिंडरचा ट्रक आला की आठ दिवसातील ग्राहक एजन्सी किंवा गोदामानुढे गर्दी करीत आहे. असे चित्र जिल्ह्यात इतरत्रही पाहावयास मिळत आहे.

Web Title: Violation of communication by gas agency operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.