बापू कुटी व सेवाग्राम आश्रमला दिली उपराष्ट्रपतींनी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:56 PM2018-02-26T13:56:24+5:302018-02-26T13:56:33+5:30
देशाचे उपराष्ट्रपती एम. व्येंकय्या नायडू यांनी रविवारी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, राज्यसभा सदस्य खा.डॉ. विकास महात्मे, आ.डॉ. पंकज भोयर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/सेवाग्राम : देशाचे उपराष्ट्रपती एम. व्येंकय्या नायडू यांनी रविवारी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, राज्यसभा सदस्य खा.डॉ. विकास महात्मे, आ.डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. आश्रमात आगमन होताच प्रथम त्यांनी आदी निवासाला भेट दिली. यानंतर बापू कुटी व आश्रमातील सर्व परिसराची पाहणी केली. यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी सुतमाळ व पुस्तक देऊन उपराष्ट्रपती नायडू यांचे स्वागत केले.
बापू कुटीमध्ये सर्वधर्म प्रार्थना, एकादश व्रत व भजन झाले. यानंतर बापू कुटीसमोर चरखाची माहिती त्यांनी जाणून घेतली. येथे काम करणाऱ्या महिलांशी उपराष्ट्रपतींनी संवाद साधला. महादेव कुटीतील कापूस ते कापड हा आश्रमचा उपक्रम त्यांनी समजावून घेत पाहणी केली.