व्हीएनआयटीच्या तज्ज्ञांकडून ‘अमृत’च्या कामांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 09:51 PM2019-01-22T21:51:04+5:302019-01-22T21:51:52+5:30
अमृत योजनेच्या माध्यमातून वर्धा शहरात सध्या विविध विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहेत. परंतु, याच कामात गैरप्रकार होत असल्याचा आरोप झाल्यामुळे सदर कामांच्या तपासणीसाठी एका खासगी संस्थेला नियुक्त करण्यात आले आहे. असे असले तरी मंगळवारी जिल्हाधिकाºयांच्या विनंतीला मान देत व्हीएनआयटी नागपूरच्या तज्ज्ञांनी वर्धेत येत काही कामांची पाहणी केली. यावेळी न.प.च्या अधिकाºयांनी सुरू असलेल्या कामांसह पूर्ण झालेल्या कामांची माहिती या तज्ज्ञांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अमृत योजनेच्या माध्यमातून वर्धा शहरात सध्या विविध विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहेत. परंतु, याच कामात गैरप्रकार होत असल्याचा आरोप झाल्यामुळे सदर कामांच्या तपासणीसाठी एका खासगी संस्थेला नियुक्त करण्यात आले आहे. असे असले तरी मंगळवारी जिल्हाधिकाºयांच्या विनंतीला मान देत व्हीएनआयटी नागपूरच्या तज्ज्ञांनी वर्धेत येत काही कामांची पाहणी केली. यावेळी न.प.च्या अधिकाºयांनी सुरू असलेल्या कामांसह पूर्ण झालेल्या कामांची माहिती या तज्ज्ञांना दिली.
जिल्हाधिकाºयांच्या विनंतीला मान देत विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्था (व्हीएनआयटी) नागपूरचे डॉ. मंगेश मांडूरवार यांनी सोमवारी दुपारी स्थानिक स्मशानभूमी परिसरात अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यानंतर या चमूतील सदस्यांनी पुलफैल भागातील काम पूर्ण झालेल्या जलकुंभाची पाहणी केली. त्यानंतर काही कामांची पाहणी करून या चमूतील सदस्यांनी न.प. कार्यालय गाठून योजनेच्या कामांबाबतची अधिकची माहिती जाणून घेतली. या कामांची पाहणी करताना डॉ. मंगेश मांडूरवार यांच्यासह नगरसेवक जयंत सालोडकर, पालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नीलेश नंदनवार, जीवन पाधिकरणाचे चंद्रशेखर खासबागे, बोरीकर, न.प.चे कर्मचारी सुजीत भोसले यांची उपस्थिती होती.
नव्या व जुन्या जलवाहिनीसह जलकुंभाची जाणली माहिती
चमूतील तज्ज्ञांना न.प.च्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नीलेश नंदनवार यांनी सुरूवातीला स्मशानभूमी परिसरात होत असलेल्या कामाची माहिती दिली. शिवाय त्यांनी पुलफैल भागातील जलकुंभ, जलकुंभातून उच्चदाबात पाणी सोडल्यास निर्माण होणाºया समस्या, जुनी व नवीन जलवाहिनी तसेच लिकेजेस दुरूस्तीदरम्यान येत असलेल्या अडचणी तसेच अमृत योजनेंतर्गत होत असलेल्या कामादरम्यान भविष्यात कुठल्याही अडचणी निर्माण होऊ नये, याबाबतची घेतली जात असलेली दक्षता आदीविषयी माहिती दिली.
तीन चमू एकाच दिवशी वर्धेत
अमृत योजनेच्या सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करून त्यात काय दोष आहेत, याबाबतचा अहवाल तयार करणारी दुसरीही एक चमू आज वर्र्ध्यात दाखल झाली असून त्याची माहिती न.प.तील लोकप्रतिनिधी तसेच अधिकाºयांना देण्यात आली नसल्याचा आरोप याप्रसंगी नगरसेवक जयंत सालोडकर यांनी केला. आज खरच दुसरीही चमू वर्ध्यात दाखल झाली काय याची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता अमृत योजनेच्या कामांची पाहणी करण्यासाठी नगरविकास विभागाची एक चमू वर्ध्यात दाखल झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यांची पाहणीची तिसरी वेळ होती. मंगळवारी दोन्ही चमंूसह स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय चमूही वर्धा शहरात दाखल झाल्याने न.प.च्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.
काम न मिळाल्याचे कारण पुढे करीत अधिकृतपणे बोलणे टाळले
आयआरएमए या संस्थेला अमृतच्या कामांचे थर्डपार्टी तपासणीचे काम देण्यात आले आहे. असे असले तरी आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी पत्र देत कामाच्या पाहणीसंदर्भात विनंती केली होती. त्या विनंतीला मान देत आम्ही आज केवळ प्राथमिक पाहणी केली आहे. या पाहणीत आम्ही केवळ तपासणी करताना आम्हाला किती कालावधी लागेल याचा अंदाज घेणार आहोत. अद्याप आम्हाला अधिकृतपणे तपासणीचे काम न दिल्याने आम्ही यावर सध्या काही बोलणे योग्य ठरणार नाही, असे पाहणी करणाºया तज्ज्ञांनी सांगत प्रसारमाध्यमांशी अधिकृतपणे बोलण्याचे टाळले. त्यांनी विविध भागातील कामाची पाहणी केली.