‘आवाज वाढव डिजे’वर थिरकली तरूणाई...

By admin | Published: January 7, 2017 12:53 AM2017-01-07T00:53:35+5:302017-01-07T00:53:35+5:30

... आवाज वाढ डिजे तुझ्या.. हे गाणे आदर्श शिंदे सादर करताच अख्या मैदानात उपस्थित तरुणाई थिरकल्याचे दिसून आले.

'Volume Up Dije' drops on the drowsiness ... | ‘आवाज वाढव डिजे’वर थिरकली तरूणाई...

‘आवाज वाढव डिजे’वर थिरकली तरूणाई...

Next

वर्धा कला महोत्सवाचे थाटात उद्घाटन : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वर्धा : ... आवाज वाढ डिजे तुझ्या.. हे गाणे आदर्श शिंदे सादर करताच अख्या मैदानात उपस्थित तरुणाई थिरकल्याचे दिसून आले. निमित्त होते वर्धा कला महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी झाले.
वर्धा कला महोत्सव समिती व श्री. दत्ता मेघे फाऊंडेशन, वर्धा द्वारा आयोजित वर्धा कला महोत्सवाचे उद्घाटन अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी अभ्युदय मेघे, तर स्वागताध्यक्ष म्हणून आ. पंकज भोयर होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अतुल तराळे, कला महोत्सवाचे अध्यक्ष संदीप चिचाटे, अशोक झाडे, स्वागत समिती अध्यक्ष वरूण पांडे, संजय इंगळे तिगावकर, नगरसेवक व उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, अभिजित श्रावणे, पवन तिजारे, अशोक झाडे, विकास फटींगे, उषाताई फाले, अनिल नरेडी, गणेश ढवळे, गौरव ओंकार यांची विराजमान होते.
सिंधूताई सपकाळ यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. तसेच मिश्कील शैलीतून समाज जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या अनुभवातून समाजाला प्रबोधन करत पोलीस मित्रांचे आभार मानले. स्वागताध्यक्ष आ. डॉ. पंकज भोयर यांनी कला महोत्सवातील विविध स्पर्धांचा उल्लेख करीत महोत्सव वर्धेतील सांस्कृतिक चळवळी जोमाने समोर नेले, असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविकातून संदीप चिचाटे यांनी कला अविष्काराचा रंगमंच म्हणजे कला महोत्सव असे मत मांडले. अभ्युदय मेघे यांनी अध्यक्षीय भाषणातून माईच्या हस्ते महोत्सवाचे झालेले उद्घाटन म्हणून महोत्सवाच्या यशाचे गमक होय, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी कला महोत्सव समिती व दत्ता मेघे फाऊंडेशन तर्फे माईचा जाहीर सत्कार करण्यात आला व एक लाख रुपयांचा धनादेश गोरगरीबांच्या सेवेसाठी झटणाऱ्या मार्इंना सुपूर्द करण्यात आला.
उद्घाटनानंतर सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, कार्तिकी गायकवाड, जान्हवी प्रभू अरोरा यांच्या सदाबहार मराठी गीतांचा कार्यक्रम पार पडला. यात फुलापेक्षा मराठी गीतांची रेलचेल पहायला मिळाली. आदर्श शिंदे यांच्या पहाडी आवाजातील ‘अगडबंब नगाडा’ या गिताने उपस्थितांची मने जिंकली तर ‘कोंबडी पळाली, माझा नवीन पोपट हा’ या सारख्या गितांनी तरूणाईला थिरकायला भाग पाडले. कार्तिकी गायकवाड हिने ‘घागर घेवून निघाली’ या सारख्या गीतातून रसिकांची दाद घेतली तर जान्हवी प्रभू अरोरा यांनी ‘मितवा सावर रे मना’ या गीतातून तरूणाईला वेड लावले.
उद्घाटनापूर्वी स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यात आला. याप्रसंगी आकाश दुर्गे यांच्या नेतृत्वात मल्लखांबाचे उत्कृष्ट सादरीकरण केले, तर लोकधारा मंच समूह संच, ३२ डान्स, वेदिका डान्स अकॅडेमीने एकापेक्षा एक नृत्यविष्कार सादर केले. संचालन सुप्रसिद्ध अभिनेती किरण शराद यांनी केले. कार्यक्रमाला वर्धा शहरातील मान्यवर व उपस्थित श्रोत्यांनी मोठ्या संख्येनी हजेरी लावून कार्यक्रम यशस्वी केला.(प्रतिनिधी)

Web Title: 'Volume Up Dije' drops on the drowsiness ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.