कामगारांना ऐच्छिक स्वेच्छानिवृत्ती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 10:20 PM2019-07-13T22:20:27+5:302019-07-13T22:21:34+5:30

आरएसआर मोहता मिल्स विव्हिंग अ‍ॅण्ड स्पिनिंग मिल येथील कपडा खाते बंद केल्यामुळे कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी कामगार मंत्री संजय कुटे यांना निवेदनाद्वारे केली.

Voluntary voluntary retirement for workers | कामगारांना ऐच्छिक स्वेच्छानिवृत्ती द्या

कामगारांना ऐच्छिक स्वेच्छानिवृत्ती द्या

Next
ठळक मुद्देराजू तिमांडे। आर.एस.आर. मोहता मिल प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : आरएसआर मोहता मिल्स विव्हिंग अ‍ॅण्ड स्पिनिंग मिल येथील कपडा खाते बंद केल्यामुळे कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी कामगार मंत्री संजय कुटे यांना निवेदनाद्वारे केली.
आर. एस. आर मोहता मिल हिंगणघाटला १२० वर्षे पूर्ण होत आहेत. या मिलमध्ये विव्हिंग अ‍ॅण्ड स्पिनिंग, प्रोसेसिंग युनिट सुरू आहे. मिलमध्ये ३ शिफ्टमध्ये कामगार काम करतात. या मिलमध्ये २०१५ पर्यंत १२०० ते १३०० कामगार काम करीत होते. तसेच ठेकेदारीमध्ये जवळपास २०० कामगार काम करतात.
१ मार्च २०१७ पासून मोहता मिलच्या व्यवस्थापनाने कपडा खाते बंद केले. २०११ पासून व्यवस्थापनाने कपडा खाते बंद करण्यासाठी प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. ३० डिसेंबर २०१६ ला औद्योगिक न्यायालयाने आदेश देऊन कपडा खाते बंद करण्यासंबंधी कामगार आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविले. मुंबई कामगार आयुक्तांनी कामगार आयुक्त, नागपूर यांना कपडा खाते बंद करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे मोहता मिल व्यवस्थापनाने कपडा खाते बंद केले.
सद्यस्थितीत मिलचे सर्व युनिट सुरू असून फायद्यात आहे. कंपनीतून कापड व सूत निर्यात केले जात आहे. असे असताना कामगार आयुक्त, मुंबई यांनी कपडा खाता बंद करण्याचे आदेश देताना कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्याचे टाळले आहे. त्यामुळे कामगारांचे अतोनात नुकसान झाले एवढेच नव्हे, तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कपडा खाता बंद करताना ४५० कामगारांना व्हीआरएस मंजूर करून द्यायला पाहिजे होता. त्याआधी व्यवस्थापनाने कपडा खात्यातील ६८ कामगारांना व्हीआरएस दिला होता.
कामगारांचे हित लक्षात घेत मोहता मिलच्या कामगारांना सरकारने व्ही.आर.एस देण्यासंबंधीचे आदेश देऊन कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री संजय कुटे यांना निवेदनातून केली आहे.

Web Title: Voluntary voluntary retirement for workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.