मतदान केंद्राधिकाऱ्यांनी सूचीतील नियमांचे पालन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:44 PM2019-03-27T23:44:23+5:302019-03-27T23:45:56+5:30

मतदान प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी आयोगाने दिलेल्या सूचीचे काटेकोरपणे पालन करावे. स्वत:च्या मनाने कुठलेही निर्णय घेऊ नये किंवा कुठलेही काम करु नये अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिल्यात.

The voting authority has to comply with the list | मतदान केंद्राधिकाऱ्यांनी सूचीतील नियमांचे पालन करावे

मतदान केंद्राधिकाऱ्यांनी सूचीतील नियमांचे पालन करावे

Next
ठळक मुद्देभिमनवार : विधानसभा संघातील कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मतदान प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी आयोगाने दिलेल्या सूचीचे काटेकोरपणे पालन करावे. स्वत:च्या मनाने कुठलेही निर्णय घेऊ नये किंवा कुठलेही काम करु नये अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिल्यात.
विद्यादीप सभागृहात देवळी विधानसभा क्षेत्रातील निवडणूकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण मंगळवारी घेण्यात आले यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी वर्धा लोकसभा निवडणुकीच्या मुख्य सामान्य निरिक्षक एन.टी.अबरु, सहाय्यक जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, देवळी विधानसभा क्षेत्राच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी दिप्ती सुर्र्यवंशी, देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे उपस्थित होते.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व मतदान केंद्राला भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी करावी. मतदान केंद्रावर पुरविण्यात येणाऱ्या २३ प्रकारच्या सुविधा यामध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, उन्हापासुन संरक्षणसाठी शेड, दिव्यांगासाठी रॅम्प असल्याची खात्री करुन घ्यावी. प्रत्येक मतदान केंद्रावर व्ही.व्ही.पॅट मशीन वापरण्यात येणार असल्याने त्यांना व्यवस्थित हाताळावे. मशीनला कुठेही छेडछाड करु नये. कर्मचाऱ्यांनी एकमेकाशी समन्वय साधून कामे करावी. मतदान प्रक्रिये दरम्यान मशीन बंद पडल्यास तात्काळ क्षेत्रिय अधिकाऱ्यांना अथवा तहसिलदार यांना सूचना द्याव्यात. मतदान प्रक्रियेत नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपले मतदान करण्यासाठी ईपीक कार्ड किंवा पोस्टल बॅलेट देण्याचा पर्याय निवडून १०० टक्के मतदान करण्याचा आदर्श निर्माण करावा. लोकशाही टिकविण्यासाठी आपले कर्तव्य आहे हे समजून काम करावे. कदाचित आपल्याला सुविधा मिळाल्या नाहीत तरीही कर्तव्य पार पाडावे अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी यावेळी केल्यात.
मतदान केद्राध्यक्षांनी बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट कॅरीग मशीन मधून बाहेर काढून अशा प्रकारे मतदान केंदात ठेवावे की जेणेकरुन मशीनचे केबलचा अडथळा मतदारांना होणार नाही याची काळजी घ्यावी. केबल जोडणी करतांना लाल व काळा रंग जुळवून जोडावा. व्हीव्हीपॅटचा पेपर लॉक नॉब उभ्या स्थिती मध्ये करुन मशीन हलू नये. सर्व जोडणी झाल्यावर कंट्रोल युनीट सुरु करुन सर्व डिस्प्ले वरील दिनांक वेळ आणि अनुक्रमांकाची आणि हिरवा दिवा चालु झाल्याची खात्री करुन घ्यावी. त्यानंतर उमेदवार किंवा प्रतिनिधीसमोर मॉक पोल घ्यावे. कंट्रोल युनिट सुरु करण्यापुर्वी काय करावे, मॉक पोल, मतदानादरम्यान मशीन बदलावी लागल्यास काय करावे, मतदान संपतांना काय करावे, आदी माहितीचे प्रशिक्षण दिप्ती सुर्यवंशी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले.
यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना व्हीव्हीपॅट मशीन हाताळण्याचे प्रात्याक्षिक करुन दाखविण्यात आले. तर वर्धा मतदार संघातील प्रशिक्षणाला मुख्य मार्गदर्शक म्हणुन उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार प्रिती डूडूलवार उपस्थित होत्या.
वर्धा विधानसभा मतदार संघातील पहिल्या टप्प्यातील दोन सत्रात १८०० कर्मचाऱ्यांना सरोज मंगल कार्यालय येथे प्रशिक्षण देण्यात आले.

Web Title: The voting authority has to comply with the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.