वाघाचा हैदोस सुरूच; गाय जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:18 PM2018-09-17T23:18:20+5:302018-09-17T23:19:09+5:30
वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असली तरी या भागातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याकडे वन विभाग दुर्लक्षच करीत आहे. भर दुपारी वाघाने गायीवर हल्ला करून तिला जखमी केले. इतकेच नव्हे तर दोन व्यक्तीच्या अंगावर वाघाने चालकरू पाहली. परंतु, वेळीच त्यांनी आरडा-ओरड केल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असली तरी या भागातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याकडे वन विभाग दुर्लक्षच करीत आहे. भर दुपारी वाघाने गायीवर हल्ला करून तिला जखमी केले. इतकेच नव्हे तर दोन व्यक्तीच्या अंगावर वाघाने चालकरू पाहली. परंतु, वेळीच त्यांनी आरडा-ओरड केल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला.
दुपारी दोन वाजता रामकृष्ण डोंगरे यांच्या गाईवर वाघाने हल्ला करुन तिला जखमी केले. गाईचा कळप जंगलात चरायला गेला असता वाघाने अचानक या जनावरांच्या कळपावर हल्ला केला. यावेळी गुराख्याने आरडा-ओरड केल्याने वाघाने घटनास्थळावरून धुम ठोकली. याच प्रसंगी त्याच भागातून सतीश बारंगे, नामदेव चिकने हे जात असताना वाघाने त्यांच्या अंगावर चाल करू पाहली. याप्रसंगी सदर दोन्ही व्यक्तींनी थोडा धाडस दाखविल्याने पुढील अनर्थ टळला.
शेतकऱ्यांसह जंगलव्याप्त भागातील ग्रामस्थांची समस्या लक्षात घेवून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका न घेता सदर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांची आहे.
वाघाची दहशत; भिवापूर (हेटी) मध्ये दवंडी
कारंजा (घा.) - तालुक्यातील जंगलव्याप्त गावातील नागरिकांमध्ये वाघाबाबतची कमालीची दशहत निर्माण झाली आहे. वाघाने आतापर्यंत पिंपरी (लिंगा) व हेटीकुंडी येथे गायीचा फडशा पाडला तर ब्राह्मणवाडा येथे शेळी ठार केली. त्या वाघाने सदर पाळीव प्राणी ठार केले त्याच वाघाने आता आपला मोर्चा भिवापूर हेटी भागाकडे वळविल्याने पोलीस पाटील यांनी गावात दवंडी देत गावातील नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. गावालगत असलेल्या काळी या पडीक भागात व्याघ्र दर्शन झाल्याने तसेच वाघाने भैय्याजी साठे यांची गाय ठार केल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.