७५.६८ कोटी प्राप्त तरीही कृषीपंपाची प्रतीक्षा

By admin | Published: May 27, 2017 12:28 AM2017-05-27T00:28:46+5:302017-05-27T00:28:46+5:30

सिंचनाकरिता शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता शासनाकडून कृषी पंप देण्याची योजना आहे.

Waiting for agricultural feathers is still achieving 75.68 crores | ७५.६८ कोटी प्राप्त तरीही कृषीपंपाची प्रतीक्षा

७५.६८ कोटी प्राप्त तरीही कृषीपंपाची प्रतीक्षा

Next

 कार्यालयात चकरा : अनुदानानंतरही शेतकरी वंचित
रुपेश खैरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सिंचनाकरिता शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता शासनाकडून कृषी पंप देण्याची योजना आहे. वर्धा जिल्ह्यात ही योजना पूर्णत्त्वास नेण्याकरिता तब्बल ७५ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. असे असताना जिल्ह्यात कृषी पंपाची प्रतीक्षा यादी मात्र कायमच असल्याचे दिसते. जिल्ह्यात आजच्या घडीला तब्बल ३ हजार २४९ शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या जोडणीची प्रतीक्षा आहे.
सिंचनाची सुविधा वाढावी याकरिता शेतकऱ्यांना कृषी पंप देण्याची योजना अंमलात आणण्यात आली. शिवाय शेतकऱ्यांवर येत असलेला वीज देयकाचा भार कमी करण्याकरिता सौर कृषी पंपाचीही योजना अंमलात आणली. मात्र जिल्ह्यात पाहीजे त्या तुलनेत या योजनेला प्रतिसाद मिळला नाही. याच्या कारणाची मिमांसा केली असता सदर पंप सर्वसाधारण शेतकऱ्यांना परवडणारे नसून ते आर्थिक दृष्ट्या महाग ठरत असल्याच्या प्रतिक्रीया काही शेतकऱ्यांकडून मिळाल्या आहेत. यामुळे त्यांच्याकडून विजेवर चालणाऱ्या कृषी पंपाकडेच शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानासह पाणी अडविण्याकरिता अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. येत्या दिवसात याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील शेतशिवारात उपलब्ध पाण्यामुळे आपणही सिंचन करून आर्थिक समृद्धी साधावी याकरिता शेतकऱ्यांनी महावितरणकडे कृषी पंप मिळण्याकरिता अर्ज सादर केला आहे. त्यांना कृषी पंपाच्या जोडणीची अपेक्षा असताना त्यांना प्रतीक्षा यादीतच राहावे लागत आहे.
जिल्ह्याला मिळणाऱ्या अनुदानातून शेतकऱ्यांच्य शेतात वीज नेण्याकरिता आवश्यक असलेले साहित्य खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. त्यांच्याकडून पंपाच्या जोडणीकरिता महावितरण कार्यालयात चकरा मारणे सुरू असून पंपाच्या जोडणीची प्रतीक्षा आहे. प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना पंप जोडणीची आवश्यकता निर्माण झाली आहे.

वर्षभरात ४ हजार ८६९ शेतकऱ्यांना जोडण्या
जिल्ह्यात ३१ मार्च २०१६ मध्ये ३ हजार ६७२ शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित होते. तर एप्रिल २०१७ पर्यंत ४ हजार ४४६ शेतकऱ्यांनी अर्ज भरले. या वर्षभरात ४ हजार ८६९ शेतकऱ्यांना महावितरणकडून जोडण्या देण्यात आल्या आहेत. या सर्व घडामोडीअंती जिल्ह्यात आजच्या घडीला ३ हजार २४९ शेतकऱ्यांना कृषी पंपाची प्रतीक्षा आहे.

 

Web Title: Waiting for agricultural feathers is still achieving 75.68 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.