जि.प.समोरील दुभाजकाला सौंदर्यीकरणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 11:41 PM2018-02-05T23:41:53+5:302018-02-05T23:42:24+5:30

मिनी मंत्रालय म्हणून ओळल्या जाणाऱ्या स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोरील रस्ता दुभाजकाची दैनावस्था झाली आहे.

Waiting for the designer in front of ZP | जि.प.समोरील दुभाजकाला सौंदर्यीकरणाची प्रतीक्षा

जि.प.समोरील दुभाजकाला सौंदर्यीकरणाची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देसाध्या रंगरंगोटीचाही विसर : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

आॅनलाईन लोकमत
वर्धा : मिनी मंत्रालय म्हणून ओळल्या जाणाऱ्या स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोरील रस्ता दुभाजकाची दैनावस्था झाली आहे. या रस्ता दुभाजकात विविध रोपटे लावणे क्रमप्राप्त असता सदर रस्ता दुभाजकाच्या सौंदर्यीकरणाकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रस्ता दुभाजक तयार केल्यापासून साधी रंगरंगोटीही करण्यात आली नसल्याचे दिसून येते. या रस्ता दुभाजकाचे तात्काळ सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे.
गत दोन वर्षांपासून शासनाच्यावतीने ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. विविध शासकीय कार्यालयांना रोपटे लावण्याचे व लावलेल्या रोपट्यांचे जतन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील दोन वर्षांमध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी रोपटे लावण्यात आली असली तरी जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील अनेक रस्ता दुभाजकांमध्ये रोपटे लावण्याचा विसर शासकीय यंत्रणेला पडल्याचे दिसून येते. ज्या कार्यालयाच्या इमारतीतून संपूर्ण जिल्ह्यात विविध योजना राबविल्या जातात त्याच मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जि.प. कार्यालयाच्या समोरील रस्ता दुभाजक गत अनेक वर्षांपासून सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेतील अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसामान्यांचे प्रतिनिधीत्त्व करणाºया लोकप्रतिनिधींच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवाय सिव्हील लाईन भागातील डॉ. आंबेडकर पुतळा चौक ते बापूराव देशमुख यांच्या पुतळ्या पर्यंतच्या मार्गावरील काही पथदिवे बंद असल्याने या परिसरात काळोख असतो. याचा महिलांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छ व सुंदर वर्धा या हेतूने सिव्हील लाईन भागातील जि. प. कार्यालयासमोरील डॉ. आंबेडकर पुतळा चौक ते बापूराव देशमुख यांच्या पुतळ्या पर्यंतच्या मार्गावरील रस्ता दुभाजकाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी आहे.
सुरक्षा पेट्याही तुटल्या
सिव्हील लाईन भागातील डॉ. आंबेडकर पुतळा चौक ते बापूराव देशमुख यांच्या पुतळ्या पर्यंतच्या मार्गावरील रस्ता दुभाजकामध्ये पथदिव्यांसाठी सुमारे १३ लोखंडी खांब उभे करण्यात आले आहेत;पण ज्या सुरक्षा पेटीतून पथदिव्यांना विद्युत पुरवठा करण्यात आला आहे, त्याच सुरक्षा पेट्या संध्या तुटलेल्या असल्याचे दिसून येते. उघड्या सुरक्षा पेट्या एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देत असून तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.
अल्पावधीत सळाखी पडल्या उघड्या
जिल्हा परिषद कार्यालयासमोरील रस्ता दुभाजक तयार केल्यापासून त्याला साधी रंगरंगोटीही करण्यात आली नसल्याचे चित्र बघावयास मिळते. इतकेच नव्हे तर संबंधीत विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे त्यावेळी तयार करण्यात आलेल्या रस्ता दुभाजकाच्या सध्या कडाही खचल्या आहेत. शिवाय रस्ता दुभाजकाच्या सळाखीही काही ठिकाणी उघड्या पडल्या आहेत. अल्पावधीतच रस्तादुभाजकातील सळाखी उघड्या पडल्याने त्यावेळी झालेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Web Title: Waiting for the designer in front of ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.