नालीच्या पाण्यातून काढावी लागते वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:43 AM2018-03-13T00:43:39+5:302018-03-13T00:43:39+5:30

येथील डॉ पंजाबराव कॉलनीच्या प्रवेशद्वराजवळ असलेला नाला रोज सकाळी चोकअप होत असून यातील पाणी रस्त्यावर येत आहे.

Waiting to get out of the drain | नालीच्या पाण्यातून काढावी लागते वाट

नालीच्या पाण्यातून काढावी लागते वाट

Next
ठळक मुद्देबांधकाम विभागाच्या अधिकारातील नालीवर अतिक्रमण

आॅनलाईन लोकमत
वर्धा : येथील डॉ पंजाबराव कॉलनीच्या प्रवेशद्वराजवळ असलेला नाला रोज सकाळी चोकअप होत असून यातील पाणी रस्त्यावर येत आहे. या पाण्यातून येथील नागरिकांना वाट शोधावी लागत असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देत कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आर्वी मार्गाच्या शेजारी असलेली ही नाली बांधकाम विभागाच्या अधिकारात येत आहे. या नालीवर सध्याच्या स्थितीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. यातच नाल्यावर चायनिजसह विविध खाद्यपदार्थ विकणाºया बंड्या लावण्यात येत आहे. या हातगाडी मालकांकडून त्यांच्याकडे शिल्लक असलेले अन्न नालीत टाकण्यात येते. शिवाय येथे वापरण्यात येत असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूही या नालीत टाकण्यात येतात. सकाळच्या सुमारास या वस्तुमुंळे हा नाला चोकअप होतो व पाणी रस्यावर येते. या घाण पाण्यातून येथील नागरिकांना वाट काढावी लागते. याकडे संबंधीत विभागाने लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या रस्त्याच्या कडेला पंजाब कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळच एक हॉटेल सुरू झाले आहे. या हॉटेल मालकाकडूनही रात्रीच्या सुमारास त्याच्याकडे शिल्लक असलेले अन्न या नालीत टाकण्यात येते. यामुळे नाली बंद होणे आता नित्याचेचे झाले आहे. या हॉटेल मालकाला नालीत अन्न टाकण्यास मनाई करण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून अनेकवेळा नोटीसी बजावण्यात आल्याची माहिती आहे.
हॉटेल मालकाच्या चौकशीची मागणी
पंजाब कॉलनीच्या प्रवेशद्वराजवळ असलेल्या या हॉटेल मालकाकडून मोठ्या प्रमाणात नालीत अन्न टाकण्यात येते. याकरिता या हॉटेल मालकाची जिल्हाधिकाºयांमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. शिवाय ग्रामपंचायत प्रशासनानेही या हॉटेल मालकावर कार्यवाही करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाकडून होते सफाई
या नाल्यात रोजच सकाळी प्लास्टिकच्या वस्तू अडत असतात. याची माहिती या भागातील नागरिकांकडून ग्रामपंचायतीला देण्यात येते. त्यांच्याकडून रोज कर्मचारी पाठवून येथे स्वच्छता करण्यात येते. यामुळे कालांतराने पाणी वाहून जाण्यास मदत होते.

Web Title: Waiting to get out of the drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.