शतकापासून वाडेगाव रस्त्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:28 PM2018-04-26T22:28:39+5:302018-04-26T22:28:39+5:30

तालुक्यातील सर्वात शेवटच्या टोकाचे ३११ लोकवस्तीचे वाडेगावला ७० वर्षांपासून रस्ता मिळाला नाही. या आदिवासी बहूल गावाकडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग अजुनही फिरकला नाही. येथे केवळ रस्ताच नाही इतर समस्याही येथे आहेत.

Waiting for the road from Wadegaon for centuries | शतकापासून वाडेगाव रस्त्याच्या प्रतीक्षेत

शतकापासून वाडेगाव रस्त्याच्या प्रतीक्षेत

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : तालुक्यातील सर्वात शेवटच्या टोकाचे ३११ लोकवस्तीचे वाडेगावला ७० वर्षांपासून रस्ता मिळाला नाही. या आदिवासी बहूल गावाकडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग अजुनही फिरकला नाही. येथे केवळ रस्ताच नाही इतर समस्याही येथे आहेत. या समस्या मार्गी काढण्याची मागणी या गावातील नागरिकांनी एका तक्रारीद्वारे मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
माणिकवाडा येथून २ कि.मी अंतरावर वाडेगाव आहे. रस्त्याच्या १८०० मिटर भागाचे डांबरीकरण करण्यात आले होते. २०० मिटर रस्त्यावर कुठलेही काम प्रशासनाने केले नाही. ग्रामस्थांनी पाच वर्षापूर्वी श्रमदान करून खडीचा रस्ता केला होता. गावाच्या सभोवताल जंगल आहे. रस्ताही जंगलव्याप्त भागातूनच आहे. वाघ, अस्वल प्राण्याच्या भीतीने गावकरी सायंकाळी ५ वाजतानंतर सदर रस्त्याने ये-जा करीत नाही. अवघ्या २०० मिटरसाठी ७० वर्षे थांबणे विकासाला काळीमा फासणारे आहे.
गावाच्या दुसऱ्या बाजुला संत भाकरे महाराज देवस्थान आहे. येथे दरवर्षी कार्यक्रम होतात. त्याला लागून कड नदी आहे. शेतकºयांची या भागात मोठ्या प्रमाणात शेती आहे. रस्त्याच्या अभावी शेतामधील पीक घरापर्यंत नेण्यास अडचणी होत आहेत. याप्रकरणी गावकºयांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला वारंवार निवेदन दिली. मात्र अधिकारी मनावर घ्यायला तयार नाही. रस्त्याच्या अभावी गावाचा विकास खुंटला आहे. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मुकावे लागत आहे. तारासावंगा ग्रामपंचायत अंतर्गत वाडेगाव येते. ग्रामपंचायतीने वारंवार प्रशासनाला निवेदन दिले. या रस्त्याकरिता केवळ पाच लाखांचा खर्च आहे. या २०० मिटर रस्त्याकरिता अधिकारी काम होणार एवढेच सांगतात, पण केव्हा हे मात्र कोणीच बोलत नाही.

Web Title: Waiting for the road from Wadegaon for centuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.