सीजीपीए प्रणालीमुळे गुणांची टक्केवारी मिळण्यास दोन दिवसांची प्रतीक्षा
By admin | Published: May 29, 2015 01:58 AM2015-05-29T01:58:06+5:302015-05-29T01:58:06+5:30
केंद्रीय बोर्डाच्या दहाव्या वर्गाचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. हा निकाल सीजीपीए या ग्रेड प्रणालीने जाहीर झाल्याने मुलांच्या गुणांची टक्केवारी पालकांना कळू शकली नाही.
वर्धा : केंद्रीय बोर्डाच्या दहाव्या वर्गाचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. हा निकाल सीजीपीए या ग्रेड प्रणालीने जाहीर झाल्याने मुलांच्या गुणांची टक्केवारी पालकांना कळू शकली नाही. याकरिता त्यांना आणखी दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याने अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत.
चेन्नईच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा निकाल आज एकाच वेळी निकाल जाहीर झाला. निकाल आॅनलाईन असल्याने सर्वत्र तो पाहण्याकरिता गर्दी झाली. एकाच वेळी निकाल जाहीर झाल्याने तो दर्शविणाऱ्या संकेतस्थळ सहजरित्या उपलब्ध होत नव्हते. याचा अनेकांना फटका बसला. अनेक शाळांना त्यांचा एकूण निकालही काढता आला नाही. शाळेला प्रत्येक मुलाचा निकाल काढून शाळेचा निकाल तयार करावा लागला, यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या.
भुगाव येथील लॉएड्स विद्यानिकेतनच्या १७, अग्रग्रामी स्कूल म्हसाळा सहा, हिंगणघाट येथील सेंट जॉन हायस्कूलच्या १७ विद्यार्थ्यांनी दहा पैकी दहा गुण घेत प्रथम श्रेणीत येण्याचा मान पटकाविला. तर पुलगावच्या केंद्रिय विद्यालयाचा निकाल शंभर टक्के निकाल लागला. विद्यार्थ्यांचा निकाल सीजीपीए (क्युम्युलेटीव्ह ग्रेड पॉर्इंट अॅव्हरेज) नुसार आल्याने वर्धा जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय कोण याचा खुलासा होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)