वनविभागाच्या प्रयत्नाअंती वाघ एमपीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:41 PM2018-10-31T23:41:11+5:302018-10-31T23:41:45+5:30

अमरावती जिल्ह्यात दोन शेतकरी व सुमारे एक डझन पाळीवप्राणी ठार करणाºया वाघाला मध्यप्रदेशाच्या जंगलात हाकलण्यात वन विभागाला यश आले आहे.

Wang MPTD | वनविभागाच्या प्रयत्नाअंती वाघ एमपीत

वनविभागाच्या प्रयत्नाअंती वाघ एमपीत

googlenewsNext
ठळक मुद्दे४५ वनकर्मचाऱ्यांचे परिश्रम : नागरिकांना सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : अमरावती जिल्ह्यात दोन शेतकरी व सुमारे एक डझन पाळीवप्राणी ठार करणाºया वाघाला मध्यप्रदेशाच्या जंगलात हाकलण्यात वन विभागाला यश आले आहे. या वाघोबाकडून आष्टी तालुक्यात कुठेही मनुष्यावरील हल्ला टळावा यासाठी आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. परिसरात वाघाची दहशत पसरली असून सीमावर्ती गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाघाचे तिवसा तालुक्यातील तळेगावला आगमन झाल्यावर आष्टी तालुक्याच्या सीमेवर वनविभागाने क्षेत्रसहाय्यक, वनरक्षक, वनमजूर यांच्यासह ४५ वनकर्मचारी तैनात केले होते. चिस्तुर, खडका, आनंदवाडी, भिष्णूर, भारसवाडा, खडकी, वाघोली, शिरसोली, किन्हाळा, चिंचोली, अंतोरा, खंबीत बेलोरा या वर्धा नदीच्या काठावरील १३ गावांंना सतर्कतेचा इशारा देत प्रतिबंधात्मक उपाययोजना येथे करण्यात आल्या. अमरावती जिल्ह्यातील चांदुर, तिवसा, मोर्शी, धामणगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकाºयांनीही प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पुढाकार घेतला होता. वर्धा जिल्ह्याची सीमा आष्टी तालुका असल्यामुळे वाघ आष्टी तालुक्यात शिरणार अशी शक्यता होती. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी उपाययोजना केल्या होत्या. पाच दिवस वाघाच्या लोकेशनचा अंदाज बांधत नागरिकांना मार्गदर्शनात्मक सुचना देण्यात आल्या. वाघाच्या पायाचे ठसे ओळखता यावे म्हणून काळी माती आणण्यात आली. मातीला ओले करून त्याचे सारवण करण्यात आले. अशा रितीने १५ ठिकाणी लोकेशन ठेवण्यात आले होते. वाघासाठी शिकार खाद्य म्हणून ४ बोकड बांधून ठेवले होते. काही ठिकाणी जाळ्या जावण्यात आल्या होत्या. वाघाच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजुरांच्या अडचणीत भर पडली होती. आता तो मध्यप्रदेशातील जंगलात गेल्याने नागरिक दहशतमुक्त झाले असल्याचे बोलले जात आहे.

आष्टी तालुक्यात वाघाला येण्यास प्रतिबंध करण्यासाठी वनपरिक्षत्रे अधिकारी अमोल चौधरी व त्यांच्या चमूने पाचदिवस अथक परिश्रम घेतले. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
सुनील शर्मा, उपवनसरंक्षक, वर्धा.

Web Title: Wang MPTD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ