वारकऱ्यांना देव्हाऱ्यातच घ्यावे लागणार ‘माऊली’चे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:00 AM2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:00:13+5:30

वारकरी संप्रदायाचे हृदयस्थान असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाची दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. ऊन्ह, वारा व पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचा पायदळ, सायकल किंवा वाहनाने प्रवास करुन पंढरपूर गाठतात. चंद्रभागेत स्नान करुन विठ्ू माऊलीचे ‘याची देही, याची डोळा’ दर्शन घेत नवी ऊर्जा घेवून परतात.

Warakaris will have to visit Mauli in Devara | वारकऱ्यांना देव्हाऱ्यातच घ्यावे लागणार ‘माऊली’चे दर्शन

वारकऱ्यांना देव्हाऱ्यातच घ्यावे लागणार ‘माऊली’चे दर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देपंढरपुरच्या वारीत खंड : जिल्ह्यातून जाणाऱ्या दिंड्या व वारी केल्या रद्द

विजय माहुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या भेटीकरिता दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा मेळा जमतोय. गावागावातून विठ्ठल नामाचा गजर करीत दिंड्या-पताका, पायदळ वाऱ्या पंढरपुरला एकत्र येतात. या शतकानुशतकाच्या परंपरेला यावर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे खंड पडणार आहेत. सर्व दिंड्या व वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वारकऱ्यांना यावर्षी आपल्या देव्हाऱ्यातीलच विठू माऊलीचे दर्शन घ्यावे लागणार आहे.
वारकरी संप्रदायाचे हृदयस्थान असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाची दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. ऊन्ह, वारा व पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचा पायदळ, सायकल किंवा वाहनाने प्रवास करुन पंढरपूर गाठतात. चंद्रभागेत स्नान करुन विठ्ू माऊलीचे ‘याची देही, याची डोळा’ दर्शन घेत नवी ऊर्जा घेवून परतात.
याच दिवशी शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, तर उत्तर भारतातून कबिराची पालखी तेथे येत असते. अशा या भव्यदिव्य सोहळ्यावर कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच विरजण पडले आहे. सर्वत्र कोरोनाचा हाहाकार असल्याने शासनाच्या सूचनांचे पालन करीत राज्यभरातील सर्व दिंड्या व वारी ही रद्द करण्यात आल्या. त्यात वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या वारंकऱ्यांनीही आपला कार्यक्रम रद्द केला आहे. परिणामी यावर्षी आषाढी एकादशीला वारकऱ्यांच्या घरोघरीच विठू नामाचा गजर होणार आहे.

विदर्भाच्या पंढरीतील वारकऱ्यांचे लॉकडाऊन
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया घोराड येथून संत केजाजी महाराज व त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र नामदेव महाराज यांनी पंढरपुरची पायदळ वारी केली. सोबतच विठ्ठल भक्त असेलेले हरिभाऊ रामटेके यांनीही पायदळ वारी केली. दरम्यानच्या काळात पायदळ वारीत खंड पडला तरी घोराडसह पंचक्रोशितील भाविक वाहनांनी वारी करतात. २००४ मध्ये संत केजाजी महाराज यांच्याप्रती श्रद्धा असलेले यवतमाळ जिल्ह्यातील नरेश महाराज पाटील हे घोराडच्या विठ्ठल रुख्माई देवस्थानचे ट्रस्टी बबन महाराज माहूरे यांच्या नेतृत्वात घोराड ते आळंदी बस व रेल्वेचा प्रवास करुन तेथून निघणाऱ्या माऊलीच्या पालखी सोहळ्यात केजाजी महाराज दिंडी म्हणून सहभागी होतात. यामध्ये जवळपास १ हजार ५०० वारकऱ्यांची उपस्थिती असते. गेल्या पाच वर्षांपासून घोराड येथील हरिभाऊ महाकाळकर हे घोराड ते पंढरपूर पायदळ दिंडीचे आयोजन करतात पण, यावर्षी लॉकडाऊनमुळे या वारीमध्ये खंड पडणार आहे.

वीस वर्षापासूनची पंरपरा खंडीत
देवळी तालुक्यातील गौळ येथील संत लोटांगण महाराज मंदिराच्यावतीने गेल्या वीस वर्षापासून आषाढी एकादशीला पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. वर्ध्यातील आर्वीनाका परिसरातील ज्ञानेश्वर मंदिरातून निघणाºया दिंडी सोहळ्याला कोरोना आपत्तीमुळे यावर्षी रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास पवार यांनी दिली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. वारीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी असते. आपण सुरक्षित राहून दुसऱ्यांना सुरक्षित ठेवण्यातच धन्यता आहे. त्यातही आषाढी एकादशीला विठू माऊलीचे मंदिर उघडे राहणार की नाही, धार्मिकस्थळे बंद असल्याने पालखी निघणार कशी, असे अनेक प्रश्न आहे. त्यामुळे आजची परिस्थिती पाहता शासनाला सहकार्य करणेच उचित ठरेल.
- पुरुषोत्तम गुजरकर, वारकरी, घोराड.

Web Title: Warakaris will have to visit Mauli in Devara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.