वर्ध्यात ७ रुग्णांची कोरोनावर मात तर जिल्ह्यात ८ कोरोनाबधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 07:10 PM2020-07-16T19:10:37+5:302020-07-16T19:10:56+5:30

वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ४४ कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ५ हजार ९४९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ५ हजार ८६३ निगेटिव्ह तर ५९ पॉझिटिव्ह आले आहेत.

In Wardha, 7 patients overcome corona, while in the district, 8 corona patients are overweight | वर्ध्यात ७ रुग्णांची कोरोनावर मात तर जिल्ह्यात ८ कोरोनाबधितांची भर

वर्ध्यात ७ रुग्णांची कोरोनावर मात तर जिल्ह्यात ८ कोरोनाबधितांची भर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यातील २२ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी गुरुवारी ७ रुग्णबरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. तर नव्याने ८ कोरोना बाधित रुग्ण सापडले असून यामध्ये ४ महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे यात आर्वी २,वर्धा ४ ,कारंजा तालुक्यातील २ रुग्ण आहेत. या रुग्णासहित जिल्ह्यातील रूग्णसंख्या ५९ झाली असून यापैकी २१ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये नालवाडी येथील ५ रुग्ण तसेच वीज वितरण विभागाचे 2 कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यांना दोन दिवस संस्थात्मक विलागलीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्र मोकळे होताच त्यांना घरी सोडण्यात येईल.

आज बाधित झालेल्या रुग्णांमध्ये आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका वय ३५ वर्ष आणि अटेंडंट वय ५५ वर्ष, वर्धा शहरातील इतवारा येथील ७२ वर्षीय महिला , हिंद नगर येथील 75 वर्षे पुरुष आणि केशव सिटी येथील ३७ वर्षीय पुरुष आणि महादेवपुरा येथील महिला तसेच कारंजा तालुक्यातील काकडा येथील पती- पत्नी वय अनुक्रमे ३० आणि २० या रुग्णांचा समावेश आहे.
यातील दोन रुग्णांना सेवाग्राम येथे तर पाच रुग्णांना सावंगी रुग्णालयात कोरोनावरील उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

महादेवपुरा येथील महिलेचा काल मृत्यू झाला असून त्यांचा अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. त्यांना काल सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजारही त्यांना होते. त्यांच्यावर आज कोरोना मार्गदर्शक नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ४४ कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ५ हजार ९४९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ५ हजार ८६३ निगेटिव्ह तर ५९ पॉझिटिव्ह आले आहेत. आज १३० स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 95 अहवाल प्रलंबित आहेत. तसेच आयसोलेशन मध्ये १४३ व्यक्ती आहेत.

६२ हजार ५६५ व्यक्तींना आजपर्यंत गृह विलगिकरण करण्यात आले आहे. त्यापैकी ५५११३ व्यक्तींचा गृहवीलगिकरण कालावधी संपला असून ७४५२ व्यक्ती आज गृहवीलगिकरणात आहेत. तसेच संस्थात्मक विलगिकरणात २६८ व्यक्ती आहेत.

Web Title: In Wardha, 7 patients overcome corona, while in the district, 8 corona patients are overweight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.