वर्धा गर्भपात प्रकरण : आरोपी डॉ. नीरज कदम सेवेतून बडतर्फ, १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 05:12 PM2022-01-18T17:12:12+5:302022-01-18T18:47:04+5:30

डॉ. नीरज कदम याच्याविरुद्ध पोक्सो कलमान्वये गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याने त्यांची सेवा तत्काळ समाप्त करुन त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचीन ओम्बसे यांनी काढले आहे.

Wardha abortion case accused dr. neeraj kadam removed from the official duty | वर्धा गर्भपात प्रकरण : आरोपी डॉ. नीरज कदम सेवेतून बडतर्फ, १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

वर्धा गर्भपात प्रकरण : आरोपी डॉ. नीरज कदम सेवेतून बडतर्फ, १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

googlenewsNext
ठळक मुद्देजि.प. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचे धडकले आदेशनीरज कदम यांची दोन दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर कारागृहात रवानगी

वर्धा : आर्वी येथील गर्भपात प्रकरणाने संपूर्ण देशाची झोप उडविली असतानाच याप्रकरणात अटक असलेल्या आरोपी डॉ. नीरज कुमारसिंग कदम याला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी पदावरुन तत्काळ बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचीन ओम्बसे यांनी काढले आहे.

आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताच्या घटनेने सर्वांचीच झोप उडाली. मागील पाच दिवसांपासून पोलीस विभाग दिवसरात्र पुरावे गोळा करण्याचे काम करीत असतानाच आरोग्य विभागाने कदम रुग्णालयातील चारही डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी पुन्हा विविध कलमान्वये गुन्हाही दाखल केला.

अटकेत असलेला डॉ. नीरज कदम हा कंत्राटी डॉक्टर म्हणून आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात जानेवारी २०१८ पासून स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होता. त्याला ५० हजार रुपये मानधनतत्वावर मिळत होते. मात्र, शासकीय औषधसाठा त्याच्या खासगी रुग्णालयात आढळून आल्याचा अहवाल टास्कफोर्स चमूने सादर केल्याने तसेच डॉ. नीरज कदम याच्याविरुद्ध पोक्सो कलमान्वये गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याने त्यांची सेवा तत्काळ समाप्त करुन त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी तथ जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओम्बसे यांनी दिले आहे. 

डॉ. नीरज कदमला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी 
आर्वी येथील गर्भपात प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. नीरज कदम याची पोलीस कोठडी मंगळवारी संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
डॉ.नीरज कदम याला पॉक्सो कायद्यांतर्गत आर्वी पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान मंगळवारी ता. १८ रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Web Title: Wardha abortion case accused dr. neeraj kadam removed from the official duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.