वर्धा-आजनसरा रस्त्याच्या डागडुजीची मागणी
By admin | Published: January 5, 2017 12:41 AM2017-01-05T00:41:01+5:302017-01-05T00:41:01+5:30
वर्धा येथून आजनसरा देवस्थानकडे जाण्याऱ्या डांबरी रस्त्याचे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून बांधकाम करण्यात आले.
निधा (टाकळी) येथे रस्त्यावर गटार : पंतप्रधान ग्राम सडक योजनेत केले होते रस्त्याचे काम
वर्धा : वर्धा येथून आजनसरा देवस्थानकडे जाण्याऱ्या डांबरी रस्त्याचे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून बांधकाम करण्यात आले. परंतु गत चार-पाच वर्षात या रस्त्याची कोणतीच दुरुस्ती किंवा डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले झाले. या मार्गावरील निधा गावाचे सांडपाणी डांबरी रस्त्यावरून वाहत असल्याने येथे गटार साचले आहे. या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
आजनसरा देवस्थानाकडे जाणारे भाविक अनेकदा या गटार अडखळून पडले आहे. दुचाकीने जाताना अपघात अधिक होतात. तर चारचाकी वाहने खड्ड्यात किंवा चिखलात फसल्याच्या घटना घड्ल्या असून या सांडपाण्याची व्यवस्था लावून या भागातील रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी आहे.
याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायत येथे तक्रार दिली. अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. या स्थळावर अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल, असे दिसून येते. या प्रकाराबाबत येथील ग्रामस्थ खंत व्यक्त करतात.
टाकळी नंतर आजनसरा जवळचा नाल्यावरील पुलाची डागडुजी करण्याची मागणी आहे. पुलाचा परिसर खचलेला आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वाराला रस्त्याचा अंदाज आला नाही तर खड्ड्यात पडून अपघात होऊ शकतो. याकडे दुर्लक्ष केले जाते.
सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, आमदार, खासदार यांना निधा येथील ग्रामस्थांनी पुन्हा निवेदन दिले आहे. आजनसरा देवस्थानाकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेकरिता येथील रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी आहे.
निधा येथे सांडपाण्यामुळे तयार झालेल्या खड्ड्याची दुरुस्ती संबंधित विभागाने करावी, अशी मागणी भाजपा सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक डॉ. विजय पर्बत, ग्रामस्थांनी केली आहे. या मार्गाची व खड्ड्यांची डागडुजी पंधरा दिवसांत केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनात देताना श्रावण काचोळे, संतोष ठाकरे, नानाभाऊ जौंजाळ, विनोद जौंजाळ, दिवाकर राऊत, मिलिंद बोंडे, रंजित राऊत, गजानन लिचडे, निलेश झाडे, प्रभाकर पारवडकर, विजय आष्टनकर आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)