वर्धा ब्लास्ट; उत्तम गलवा कंपनीतील दुसऱ्या कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 12:01 PM2021-02-16T12:01:42+5:302021-02-16T12:02:14+5:30
Wardha News उत्तम गलवा कंपनीतील दुसऱ्या कामगाराचा नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. कामगार उत्तर प्रदेशातील कानपूर जवळील फत्तेपुरचा रहिवासी होता.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उत्तम गलवा कंपनीतील दुसऱ्या कामगाराचा नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.
कामगार उत्तर प्रदेशातील कानपूर जवळील फत्तेपुरचा रहिवासी होता.
नजीकच्या भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत बुधवार ३ फेब्रुवारीला ब्लास्ट फरनेस विभागात झालेल्या अपघातात ३९ मजूर भाजल्या गेले. कंपनीत मेंटेनन्सच्या कामासाठी काही कुशल कामगारांना कंपनी प्रशासनाने पाचारण केले होते.