वर्धा जिल्ह्यात कापसाला प्रथमच मिळाला योग्य भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:13 PM2019-12-20T12:13:32+5:302019-12-20T12:14:18+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर अंतर्गत येणाऱ्या धोंडगावमधील श्रीकृष्ण जिनींग अॅन्ड प्रेसिंग येथे यंदा शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळाला आहे. या भावामुळे शेतकरी वर्ग आनंदला आहे.
ठळक मुद्दे५ हजार ३५१ रुपये दिला गेला भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर अंतर्गत येणाऱ्या धोंडगावमधील श्रीकृष्ण जिनींग अॅन्ड प्रेसिंग येथे यंदा शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळाला आहे. या भावामुळे शेतकरी वर्ग आनंदला आहे.
येथे प्रथम कापूस घेऊन येणारे शेतकरी भारत जैयस्वाल यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या जिनींगमध्ये २०१९ या वर्षाकरिता कापसाला ५ हजार ३५१ असा भाव मिळाल्याने शेतकरी आनंद व्यक्त करीत आहे. याप्रसंगी वरिष्ठ संचालक महेश झोटिंग, जनार्दन हुलके, गणेश वैरागडे, माजी संचालक शांतीताल गांधी आदी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.