वर्धा जिल्ह्यात पाच कुटुंबियांसह पोलिस पाटलांच्या साक्षीने झाला विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 09:46 AM2020-04-27T09:46:19+5:302020-04-27T09:46:48+5:30
साधेपणाची शिकवण जगाला देणाऱ्या महात्मा गांधी यांचे दीर्घ वास्तव्य असलेल्या जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजता एक विवाह अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: साधेपणाची शिकवण जगाला देणाऱ्या महात्मा गांधी यांचे दीर्घ वास्तव्य असलेल्या जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजता एक विवाह अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला. मांडगाव येथे झालेल्या या विवाहाच्या वेळी वराकडून २ तर वधूकडून ३ जण उपस्थित होते. या विवाहाला स्थानिक पोलीस पाटलांचीही उपस्थिती होती.
बोथुडा या गावातील आकाश घनश्याम किरपाल व मांडगाव येथील विद्या हरिदास तडस हे दोघेही परस्परांना हार घालून विवाह बंधनात अडकले. यावेळी गावकरी वा अन्य नातेवाईक उपस्थित नव्हते. पोलिस पाटलांनी वरवधूला आशीर्वाद दिले.