वर्धा जिल्ह्यात मागचे दोन्ही टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन एकाचा मृत्यू तर पाच गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 11:41 AM2021-02-12T11:41:54+5:302021-02-12T11:42:17+5:30

Wardha News समुुद्रपुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग नागपुर चंद्रपुर हायवेवर बरबडी शिवारात गुरुवारी संध्याकाळी नागपुरवरुन वणीला सेंट्रिग घेऊन जात असताना बुलेरो पिकअप गाडीचे मागील दोन टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच गंभीर जखमी झाले आहेत.

In Wardha district, one died and five were seriously injured when both rear tires burst | वर्धा जिल्ह्यात मागचे दोन्ही टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन एकाचा मृत्यू तर पाच गंभीर जखमी

वर्धा जिल्ह्यात मागचे दोन्ही टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन एकाचा मृत्यू तर पाच गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देबरबडी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: समुुद्रपुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग नागपुर चंद्रपुर हायवेवर बरबडी शिवारात गुरुवारी संध्याकाळी नागपुरवरुन वणीला सेंट्रिग घेऊन जात असताना बुलेरो पिकअप गाडीचे मागील दोन टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच गंभीर जखमी झाले आहेत. मृत व्यक्तीचे नाव फुलकुमार झाडू उईके रा सिल्लारी जी शिवणी ( म. प्रदेश) असे आहे.

प्राप्त माहितीनुसार नागपुरवरुन अर्थव प्रि क्रॉस कंपनीचे पाच मजुर व गाडी चालक हे सर्वजण सेंट्रिगचा माल घेऊन वणीला आर व्ही उंबरकर या रोड कंत्राटदार याचेकडे कामाला जात असताना त्यांच्या गाडीचे मागचे दोन्ही टायर फुटल्याने बरबडी शिवारातील अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

महामार्ग रुग्णवाहिकेचे चालक अमित रोंगे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर येथे दाखल करण्यात आले होते. परंतु दोन रुग्णांची प्रकुती चिंताजनक असल्याने यातील चारही जखमीना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले आहे.
यात गजानन छोटु सलामे, पंकज किसन मरस्कोल्हे, राजेश गोपाल वाढिवे अशी जखमींची नावे आहेत.

Web Title: In Wardha district, one died and five were seriously injured when both rear tires burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात