वर्धा जिल्ह्यात बैलांनी भरलेला ट्रक उलटला; १६ मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 17:29 IST2019-12-19T17:28:46+5:302019-12-19T17:29:15+5:30
गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास नागपूरकडून अमरावतीकडे जाणारा ट्रक सत्याग्रही घाटातील वळणमार्गावर उलटला. या ट्रकमधून बैल नेण्यात येत होते. या अपघातात १६ बैल मृत्युमुखी पडले आहे तर काही जखमी झाले आहेत.

वर्धा जिल्ह्यात बैलांनी भरलेला ट्रक उलटला; १६ मृत्युमुखी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास नागपूरकडून अमरावतीकडे जाणारा ट्रक सत्याग्रही घाटातील वळणमार्गावर उलटला. या ट्रकमधून बैल नेण्यात येत होते. या अपघातात १६ बैल मृत्युमुखी पडले आहे तर काही जखमी झाले आहेत.
ट्रक क्र. एम.एच. १२ एच.डी. ४४५९ हा ट्रक नागपूरहून अमरावतीकडे भरवेगाने जात असताना घाटात अनियंत्रित झाला व उलटला. रस्त्याच्या मध्यभागी पडल्याने या अपघातात १६ बैल जागीच ठार झाले तर काही जखमी झाले. या अपघातानंतर ट्रकचा वाहक व चालक घटनास्थळाहून पसार झाले. जखमी बैलांवर उपचार करून त्यांना गोरक्षणमध्ये रवाना करण्यात आले आहे.