वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हरभऱ्यासह गव्हाला झोडपून काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 01:07 PM2021-02-18T13:07:28+5:302021-02-18T13:07:58+5:30
Wardha News झडशी परिसरात दोन दिवस रात्रीला आलेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा रब्बी पिकाला फटका बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: झडशी परिसरात दोन दिवस रात्रीला आलेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा रब्बी पिकाला फटका बसला आहे.
खरीप हंगामत सोयाबीन, कपासीने शेतकऱ्यांना दगा दिल्यानंतर सेलू तालुक्यातील परिसरात रब्बी हंगामात गहू व चणा या पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या परिसरात चणा पिकाची सवंगणी सुरु असुन सवंगणी केलेला चणा शेतात पडून आहे बुधवारला व गुरुवारच्याला दुपारच्या सुमारास ११.३० पासून पावसाची हजेरी सुरु झाली.
आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने परिसरातील शेतामध्ये सवंगनी करुन पडलेला चणा ओला झाला. तर काही शेतकऱ्यांचा गहु वादळामुळे झोपल्या गेला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या तुरीची मळणी व्हायची आहे त्यांच्या तुरीच्या गंज्या सुद्धा ओल्या झाल्या आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. हवामान खात्याने वादळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तविली असुन असे झाल्यास याचा फळबागसह भाजीपाला पिकांना बसण्याची शक्यता असुन विशेषत: कांद्याचे पिकांना अधिक धोका आहे. त्यामुळे खरिपासह रब्बी हंगामातीलही हातचे पिक जाईल काय या विवंचनेत शेतकरी दिसत आहे.