वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग येणार

By admin | Published: February 14, 2017 01:25 AM2017-02-14T01:25:11+5:302017-02-14T01:25:11+5:30

जिल्ह्यात रोजगाराच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन करण्याचे चालले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार होत आहे.

Wardha district will have a large number of industries | वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग येणार

वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग येणार

Next

देवेंद्र फडणवीस : सेवाग्राम जगात शांतीचे प्रतिक म्हणून दीपस्तंभासारखे काम करेल- मुनगंटीवार
वर्धा : जिल्ह्यात रोजगाराच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन करण्याचे चालले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार होत आहे. दुसरीकडे ड्रायफूटचे काम होणार आहे. या माध्यमातून रेल्वेचे मोठे जाळेही तयार करीत आहे. वर्धा-नांदेड रेल्वेची कनेक्टीव्हिटी असेल. आर्वी ते पुलगाव ब्रॉडगेजचे काम असेल, या प्रकल्पांना मान्यता दिली असून मोठ्या प्रमाणावर येथे उद्योग येणार आहे. कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आंजी(मोठी) येथील प्रचार सभेत केले.
नगर पालिकांच्या निवडणुकीत काँगेसचा सुपडा साफ केला. आता जिल्हा परिषदेतही हे होणार आहे, असा दावाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला.
व्यासपीठावर राज्याचे अर्थ व वित्त मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे व विजय मुडे यांच्यासह उमेदवार विराजमान होते.
एकीकडे अन्न, वस्त्र, निवारा दुसरी कडे शिक्षण, आरोग्य रोजगार आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात राज्य शासनाने चांगले काम करण्याचा प्रयत्न सुरू केला. २०१४ रोजी जेव्हा भाजपचे सरकार आले तेव्हा महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रात भारतात ५८ व्या क्रमांकावर होता. जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या पाचवीच्या ६० टक्के मुलांना तिसरीचे पुस्तक देखील वाचता येत नव्हते. आता महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणायचे आहे. शाळा डिजीटल करतो आहे. वर्षभरात १५ हजार पालिकांनी आपल्या पाल्यांचे खासगी शाळांतून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिशेब चुकता करण्याची वेळ आली आहे. १५ वर्षे ज्यांची सत्ता होती. त्यांनी महाराष्ट्राची वाट लावली. त्यांनी महाराष्ट्राच्या पवित्र विकास कामांचे अमंगल केले. त्या या निवडणुकीत धडा शिकविण्याची गरज आहे. सिंचनाचे प्रकल्प व्हावे, सेवाग्रामच्या २६६ कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली. तो जेव्हा पूर्ण होईल. जगाच्या १९५ देशांच्या नकाशात सेवाग्राम एक शांतीचे प्रतिक म्हणून दीपस्तंभासारखे काम करेल, असेही ते म्हणाले. या सभेनंतर ना. मुनगंटीवार यांनी नालवाडी(म्हसाळा), पिपरी(मेघे), तळेगाव(श्या.), मांडगाव, वडनेर, नंदोरी व गिरड येथे प्रचार सभांना संबोधित करुन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा खरपूस समाचार घेत भाजप सरकारच्या योजनांवर प्रकाश टाकला.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Wardha district will have a large number of industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.