वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको, रस्त्यावर दूध ओतून नोंदवला सरकारचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 09:03 AM2018-06-07T09:03:19+5:302018-06-07T09:03:19+5:30
परसोडी टेंभरी येथील संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कृषिमाल आणि दुधाच्या सातत्याने ढासळणाऱ्या दरांविरोधात वेरूळ- आंजी येथे रास्ता रोको केला.
वर्धा : परसोडी टेंभरी येथील संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कृषिमाल आणि दुधाच्या सातत्याने ढासळणाऱ्या दरांविरोधात वेरूळ- आंजी येथे रास्ता रोको केला. आंदोलनादरम्यान दूध रस्त्यावर ओतून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. सातत्याने दूध आणि कृषि मालाच्या ढासळणाऱ्या किंमती पाहता शेतकऱ्याचे जगणे अवघड झाले असून अद्याप शेतकरी कर्जमाफी मिळाली नसून यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश यामध्ये होता.
राज्यभर शेतकरी संघटनेचे सुरू असलेल्या आंदोलनाचे लोन परसोडी टेंभरीसारख्या गावांमध्येही पोहोचले आहे. आंदोलनाच्या अंतिम दिवसांमध्येही राज्य सरकारविरोधात आजूबाजूच्या गावांसह तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.