वर्धा गर्भपात प्रकरण : ‘तो’ शासकीय औषधसाठा आला कोठून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 02:55 PM2022-02-15T14:55:19+5:302022-02-15T14:56:50+5:30

येथील उपजिल्हा रुग्णालयातील साठा नोंदवही प्रमाणे व्यवस्थित असल्याचे सूतोवाच शल्यचिकित्सकांंसह वैद्यकीय अधीक्षकांनी केले होते. मग, हा औषधसाठा आला कुठून, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

Wardha illegal Abortion Case: investigation over government drug stocks | वर्धा गर्भपात प्रकरण : ‘तो’ शासकीय औषधसाठा आला कोठून?

वर्धा गर्भपात प्रकरण : ‘तो’ शासकीय औषधसाठा आला कोठून?

Next
ठळक मुद्देतीन परिचारिकांचे नोंदविले बयाण

राजेश सोळंकी

देऊरवाडा (आर्वी) : अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाची चौकशी व तपासणी सुरू असतानाच पोलिसांना कदम हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय औषधांचा साठा आढळल्याने खळबळ उडाली होती. तो साठा जप्त करण्यात आला. त्याच्या तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी गती दिली असून पोलीस उपनिरीक्षक ज्योत्स्ना गिरी यांनी या प्रकरणातील डॉक्टर दाम्पत्यांना बोलके करण्याचा प्रयत्न केला.

येथील उपजिल्हा रुग्णालयातील साठा नोंदवही प्रमाणे व्यवस्थित असल्याचे सूतोवाच शल्यचिकित्सकांंसह वैद्यकीय अधीक्षकांनी केले होते. मग, हा औषधसाठा आला कुठून, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे हा औषधसाठा आला कसा याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे. त्याच अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालयातील औषधीसाठा पुस्तकाची तपासणी करण्यात आली असून तीन परिचारिकांची बयाणे नोंदविण्यात आल्याची माहिती आहे.

न्यायालयाने अधिक तपासणीसाठी डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. मंगळवारी १५ रोजी पुन्हा दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ

पोलीस कोठडी दरम्यान डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांनी शासकीय औषधसाठा आला कुठून याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला. आम्ही काहीच केले नाही, असे त्यांचे म्हणणे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोन्ही आरोपींची उद्या पोलीस कोठडी संपणार आहे. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणाची अधिक माहिती मंगळवारी १५ रोजी देण्यात येईल.

सुनील साळुंखे, एसडीपीओ, आर्वी.

Web Title: Wardha illegal Abortion Case: investigation over government drug stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.