वर्धा: लक्ष्मीनारायण मंदिरात पार पडली वृंदावनची लठमार होळी
By अभिनय खोपडे | Published: March 5, 2023 09:31 PM2023-03-05T21:31:15+5:302023-03-05T21:31:47+5:30
विनारंगांची होळी रविवारी प्रसिद्ध लक्ष्मीनारायण मंदिरात खेळण्यात आली
वर्धा: वृन्दावनची ‘लठमार ‘ होळी देशभर परिचित आहे. गोपिका आपल्या पती, प्रियकरास लाठीने मारतात व ते त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करीत पळ काढतात. यावेळी रंगांची व फुलांची उधळण होत असते. तशीच पण विनारंगांची होळी रविवारला येथील प्रसिद्ध लक्ष्मीनारायण मंदिरात खेळण्यात आली. हे देवस्थान सुप्रसिद्ध उद्योजक बजाज कुटुंबातील विश्वस्त संचालित करतात.
या खास होळीसाठी हा परिवार पुण्यातून वर्धेत येत असतो. हयात असतांना राहुल बजाज हे पण हजेरी लावून जायचे. तसेच लठमार नृत्य वृन्दावनची चमू सादर करणार आहे. रंग नव्हे तर फुलांची उधळण होणार. त्यासाठी शंभर किलो गुलाब फुले विकत आणण्यात आले सामान्यही नागरिक यात सहभागी झाले होते.