वर्ध्याचे आमदार पंकज भोयर कोरोना पॉझिटिव्ह; सावंगी रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 10:34 IST2020-08-21T10:34:13+5:302020-08-21T10:34:56+5:30
गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने आमदार पंकज भोयर यांनी तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यांना सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

वर्ध्याचे आमदार पंकज भोयर कोरोना पॉझिटिव्ह; सावंगी रुग्णालयात दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने आमदार पंकज भोयर यांनी तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यांना सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
फेसबुकवर शुक्रवारी सकाळी टाकलेल्या पोस्टवर त्यांनी, गेल्या काही दिवसांपासून आपली तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे जनसंपर्क पूर्णपणे बंद केला होता. दोन दिवसांपूवी कोविड १९ ची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह निघाली आहे. त्यामुळे गुरुवारी रात्रीच सावंगी येथील रुग्णालयात दाखल झालो आहे. आपणा सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.