वर्ध्यात केवळ १४ टक्के उद्योगांनी मागितली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 05:00 AM2020-04-30T05:00:00+5:302020-04-30T05:00:18+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या अशा एकूण सुमारे ५५० उद्योगांमधील कामांना ब्रेक लागला. त्यानंतर शासनाने शिथिलता दिल्याने वर्धा जिल्ह्यातील सुमारे ८० मध्यम व मोठ्या उद्योगांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी प्राप्त केली आहे. सद्यस्थितीत त्यापैकी ६० उद्योगांनी कामांना गती देण्यास सुरूवात केली आहे. याबाबतची नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

In Wardha, only 14 per cent industries sought permission | वर्ध्यात केवळ १४ टक्के उद्योगांनी मागितली परवानगी

वर्ध्यात केवळ १४ टक्के उद्योगांनी मागितली परवानगी

Next
ठळक मुद्दे६० उद्योगांमध्ये कामाला गती : जाचक अटीमुळे जिल्ह्यातील अनेक उद्योग बंदच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत उद्योग सुरू करण्याची भूमिका घेतली आहे. ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यात केवळ १४ टक्केच उद्योगांनी २० एप्रिलनंतर उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. त्यापैकी केवळ ६० मध्यम व मोठ्या उद्योगांमध्ये कामाला गती देण्यात येत आहे.
वर्धा जिल्ह्यात लघु, मध्यम व मोठे असे एकूण सुमारे ४,५०० उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये ३० हजारांवर कामगार कार्यरत आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. उद्योगच बंद ठेवण्याची वेळ आल्याने उद्योगपतींवर आर्थिक संकट ओढवले आहे. सुरुवातीला २१ दिवसांचे लॉकडाऊन संपल्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविण्यात आला. याच दरम्यान शासनाने काही जिल्ह्यांमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी काही नियम व शर्ती क्रमप्राप्त केल्या. त्यासंदर्भातील परवानगी देण्याचे अधिकार जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना मिळाले. शासनाकडून हीच शिथिलता दिल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या एकूण १३१ उद्योजकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रितसर अर्ज दाखल केले. त्यापैकी काही उद्योजकांनी दोनवेळा तर काहींनी तीनवेळा अर्ज दाखल केल्याचे छानणीदरम्यान पुढे आले आहे. अर्ज छानणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ८० उद्योगांना सोशल डिस्टन्सिंग तसेच कोरोनाबाबत दक्षता घेण्याच्या नियम व अटींचे पालन करण्याच्या लेखी सूचना देत परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी ६० उद्योग सुरू झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.

५५० मध्यम व मोठे उद्योग
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या अशा एकूण सुमारे ५५० उद्योगांमधील कामांना ब्रेक लागला. त्यानंतर शासनाने शिथिलता दिल्याने वर्धा जिल्ह्यातील सुमारे ८० मध्यम व मोठ्या उद्योगांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी प्राप्त केली आहे. सद्यस्थितीत त्यापैकी ६० उद्योगांनी कामांना गती देण्यास सुरूवात केली आहे. याबाबतची नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

...म्हणून अर्जाची संख्या वाढली
जे उद्योजक आपला उद्योग लॉकडाऊनच्या काळात सुरू करू पाहत आहेत, अशांनी रितसर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्याचे आवाहन वर्धा जिल्हा प्रशासनाने केले आहे. शासनाने शिथिलता दिल्यानंतर आतापर्यंत एकूण १३१ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेत. या अर्जांपैकी अनेक उद्योगांच्यावतीने अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत बदल होताच दोनवेळा, तर काहींनी तीनवेळा अर्ज सादर केला. त्यामुळे प्राप्त अर्जांची संख्या वाढली. परंतु, अर्ज छानणीदरम्यान ही बाब वर्धा जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. एकूणच कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेले लॉकडाऊन मोठे आर्थिक संकटच घेऊन आले आहे. सरकारही त्यातून कसे सावरता येईल यासाठी रणनिती आखत आहे.

लॉकडाऊनच्या काळातही उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने पाऊल टाकले आहे. शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु, २० एप्रिलनंतर उद्योग सुरू करणाºयाना परवानगी देताना शासनाने काही जाचक अटी लादल्या आहेत. यामुळेच वर्धा जिल्ह्यातील नव्हे,तर राज्यातील उद्योजक परवानगी घेऊन उद्योग सुरू करण्याचा विषय टाळत आहेत. शासनाने जाचक अटी मागे घेतल्यास अनेकांना आपले उद्योग सुरू करता येईल. शिवाय कामगारांना रोजगार मिळेल.
- प्रवीण हिवरे, अध्यक्ष, एम.आय.डी.सी. इंड्रस्ट्रियल असोसिएशन, वर्धा.

Web Title: In Wardha, only 14 per cent industries sought permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.