‘डिटेक्शना’त वर्धा पोलिस राज्यात ‘फस्ट’; ‘बेस्ट इन्व्हेस्टीकेशन’ पुरस्कार जाहीर

By चैतन्य जोशी | Published: August 4, 2023 06:18 PM2023-08-04T18:18:58+5:302023-08-04T18:21:38+5:30

पोलिस महासंचालकाकडून रिवॉर्ड

Wardha Police 'First' in State in 'Detection'; 'Best Investigation' Award announced | ‘डिटेक्शना’त वर्धा पोलिस राज्यात ‘फस्ट’; ‘बेस्ट इन्व्हेस्टीकेशन’ पुरस्कार जाहीर

‘डिटेक्शना’त वर्धा पोलिस राज्यात ‘फस्ट’; ‘बेस्ट इन्व्हेस्टीकेशन’ पुरस्कार जाहीर

googlenewsNext

वर्धा : ज्या घटनांचा उलगडा मागील अनेक वर्षांपासून झालेला नव्हता अशा खुनांच्या घटनांचा उलगडा पोलिस अधीक्षक नुरल हसन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने केल्याने तसेच सराईत गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार, एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन सळोकी पळो लावून जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणल्याने वर्धापोलिस विभाग गुन्हे ‘डिटेक्शना’त राज्यातून ‘फस्ट’ आला आहे. याअनुषंगाने विशेष पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी वर्धा पोलिस विभागाला ‘बेस्ट इन्व्हेस्टीकेशन’ अर्वाड जाहीर केला आहे.

वर्धा जिल्ह्यात गुन्हेगारीने डोकेवर काढले होते. दारुचा महापूर होता तसेच खून, खुनाच्या घटनांनी देखील डोकेवर काढले होते. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पदभार स्विकारताच दारुविक्रेत्यांना सळो की पळो लावले. गुन्हेगारी टोळ्या मोडीत काढून एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली. मागील अनेक वर्षांपासूनचे खुनाचे गुन्हे ज्यांचा उलगडा होत नव्हता अशा कारंजा आणि आर्वी येथील खुनाच्या गुन्ह्यांचा उलगडा करुन आरोपींना जेरबंद केले. दारुविक्रेत्यांच्या मुसक्या आवळून अनेक प्रकरणांचा यशस्वी तपास केला. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी केलेल्या यशस्वी तपास आणि गुन्हेगारीवर वचक निर्माण केल्याने वर्धा पोलसांना राज्यात ‘बेस्ट इन्व्हेस्टीकेशन अर्वाड जाहीर करण्यात आला आहे.

१० हजारांचा रिवॉर्ड जाहीर

वर्धा पोलिसांनी केलेल्या यशस्वी तपासामुळे विविध गंभीर तसेच उलगडा न होणाऱ्या गुन्ह्यांचा देखील उलगडा करण्यात आला आहे. त्यामुळे विशेष पोलिस महासंचालक रजनीश सेठा यांनी राज्यातील पहिला बेस्ट इन्व्हेस्टीकेशन पुरस्कार वर्धा पोलिस विभागाला जाहीर करुन १० हजार रुपयांचा रिवॉर्ड जाहीर केला.

वर्धा पोलिसांची यशस्वी कामगिरी

  • जिल्ह्यातील गॅंगवॉर मोडीत काढला.
  • ५०० वर सराईत गुन्हेगारांवर कलम ११० अंतर्गत कारवाई केली.
  • जवळपास सात दारुविक्रेत्यांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई
  • ५० वर गुन्हेगारांना तडीपार केले.
  • जवळपास तीन पटीने म्हणजेच ५ कोटी रुपयांचा दारुसाठा जप्त केला.
  • दोन खुनांच्या घटनांचा उलगडा केला.
  • सेवा, व्हिजीटर मॅनेजमेंट सिस्टम तसेच ई दरबार, क्यु.आर कोड उपक्रम सुरु केला.


या तपासाकरिता मिळाला अवॉर्ड

सत्याग्रही घाट तळेगाव परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह जळालेल्या कुजलेल्या स्थितीत आढळून आला होता. पोलिसांनी विविध पथके तयार करुन जवळपास ३ हजारांवर मिसिंग महिलांची पाहणी केली.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करुन फुटेज तपासण्यात आले. जवळपास १५०० महिलांची तपासणी केली. अखेर पोलिसांना यश आले आणि तो मृतदेह ज्योत्सना भोसले हिचा असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणात दोन आरोपींना अटक केली असता त्यांच्यावर विविध गंभीर गुन्ह्यांच्या कलमान्वये १० गुन्हे दाखल दाखल असल्याची माहिती मिळाली अन् पोलिसांनी अनडिटेक्ट गुन्हा डिक्टेट केला. यासाठी महाराष्ट्राातून वर्धा पोलिसांना सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषणासाठी बक्षिस जाहीर झाले.

Web Title: Wardha Police 'First' in State in 'Detection'; 'Best Investigation' Award announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.