खासगीकरणाच्या विरोधात वर्ध्यात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 02:08 PM2020-01-08T14:08:07+5:302020-01-08T14:08:32+5:30

शासकीय विभागांमधील खासगीकरण थांबविण्यात यावे यासह अनेक मागण्यांसाठी विविध कामगार व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत बुधवारी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

Wardha protests against privatization | खासगीकरणाच्या विरोधात वर्ध्यात मोर्चा

खासगीकरणाच्या विरोधात वर्ध्यात मोर्चा

Next
ठळक मुद्देविविध संघटनांनी केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: शासकीय विभागांमधील खासगीकरण थांबविण्यात यावे यासह अनेक मागण्यांसाठी विविध कामगार व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत बुधवारी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तसेच जुनी पेंशन योजना लागू करावी या व अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले. सदर मोर्चात महसूल, आरोग्य, शिक्षण यांच्यासह शासनाच्या विविध विभागांचे कंत्राटी तसेच शासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

Web Title: Wardha protests against privatization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.