वर्धा रेल्वेस्थानकाचा स्वच्छतेत देशात ३६ वा तर विभागात सातवा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 10:05 AM2017-11-22T10:05:39+5:302017-11-22T10:09:24+5:30
महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून वर्धा रेल्वे स्थानकात ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’ अभियान राबविण्यात आले. या सफाई अभियानात वर्धा रेल्वे स्थानकाला देशात ३६ वा तर मध्य रेल्वे विभागात सातवा क्रमांक प्राप्त झाला आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : गांधी जिल्हा म्हणून वर्ध्याची ओळख आहे. यामुळे महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून वर्धा रेल्वे स्थानकात ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’ अभियान राबविण्यात आले. या सफाई अभियानात वर्धा रेल्वे स्थानकाला देशात ३६ वा तर मध्य रेल्वे विभागात सातवा क्रमांक प्राप्त झाला आहे. याचे श्रेय सफाई कामगार व अधिकारी यांना दिले जात आहे.
विदर्भ युवक स्वंयरोजगार सेवा सहकारी संस्थेला २०१३ मध्ये वर्धा रेल्वे स्थानकाचा सफाईचे कंत्राट मिळाले. तेव्हपासून संस्थेने वर्धा रेल्वेस्टेशनने सफाईकडे विशेष लक्ष दिले. सदर काम संस्था यांत्रिकी पद्धतीने करीत आहे. संस्थेने सफाई यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली. या यंत्रांद्वारे वर्धा रेल्वेस्टेशनची सफाई केली जात आहे. स्टेशनवरील प्रवाशांनीही सफाई अभियानात सहभागी होऊन स्टेशन स्वच्छ राहील याची दक्षता घेतल्याचे दिसून आले. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वर्धा रेल्वे स्थानकाची स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले आहे.