वर्धा नदीला आला पूर; आर्वी-अमरावती मार्ग झाला बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 10:06 AM2022-08-08T10:06:23+5:302022-08-08T10:07:28+5:30
ऊळवाडा येथील स्मशानभूमी ही पाण्यात गेली असून नदीकाठची पूर्ण शेती पुराच्या प्रभावात पाण्याखाली आले
आर्वी( वर्धा) : रविवारी सायंकाळपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे आर्वी तालुक्यातील देउरवाड़ा येथील वर्धा नदीला पूर आला असल्यामुळे पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली. आर्वी आगाराने या मार्गावरील बस फेऱ्या रद्द केल्या असल्याची माहिती दिली प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
अप्रिय घटना होउ नाही पुरात कोणी वाहने टाकू नये चालवू नये यासाठी आर्वी पोलीस विभागाने पोलीस बंदोबस्त वर्धा नदी काठावर तैनात केलेला आला आहे. देऊळवाडा येथील स्मशानभूमी ही पाण्यात गेली असून नदीकाठची पूर्ण शेती पुराच्या प्रभावात पाण्याखाली आले आहे वर्धा नदीचा पूर पाहण्यास परिसरातील नागरिकांनी भर पावसात छतरी घेऊन गर्दी केली असल्याचे चित्र दिसून आले. निम्न वर्धा धरणाची सर्व दारे उघडली पाण्याचा विसर्ग सुरु
पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले असून धनोडी निम्न वर्धा प्रकल्प धरण प्रचलन सूची आर ओ एस नुसार या धनोडी प्रकल्पाची सोमवारी सकाळी ७.३० ला सर्वाच्या सर्व म्हणजे ३१ दारे ७० सेंटीमीटरने उघडण्यात आली आहे यातून १८८५.५९ घनमीसे पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे रविवारी रात्री या प्रकल्पाची ३१दारे उघडण्यात आली होती
वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती पवन पांढरे उपविभागीय अभियंता निमन वर्धा प्रकल्प उपविभाग क्रमांक दोन धनोडी तालुका आर्वी यांनी दिली आहे