जलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्हा विभागात अव्वल

By admin | Published: September 21, 2016 01:06 AM2016-09-21T01:06:18+5:302016-09-21T01:06:18+5:30

पावसाच्या पाण्यावरील शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी करून शेत-शिवारात जलसाठे निर्माण व्हावेत या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या

Wardha is the top in the district division in the implementation of water tank | जलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्हा विभागात अव्वल

जलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्हा विभागात अव्वल

Next

३७ हजार दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्मिती
वर्धा : पावसाच्या पाण्यावरील शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी करून शेत-शिवारात जलसाठे निर्माण व्हावेत या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्हा आघाडीवर आहे. नागपूर विभागातील सहांपैकी सर्वाधिक पाणी साठवण क्षमता वर्धा जिल्ह्यात निर्माण झाली. जलयुक्त शिवार अभियानामुळे २५ हजार हेक्टर संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यात ४ लाख ४८ हजार २८५ हेक्टर क्षेत्रावर यावर्षी खरीपाची लागवड झाली आहे. त्यामध्ये केवळ २७ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून उर्वरित ७३ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यामुळे पावसाची अनियमितता आणि शेतीची उत्पादकता यांचा थेट संबंध आपल्या जिल्ह्यात पहायला मिळतो. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना हा अनुभव आलाच. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे झालीत, तेथील शेतकऱ्यांना तिथे साचलेल्या पाण्याने तारले. आॅगस्ट महिन्यात पावसाने महिनाभर खंड दिला. पिके कोमेजायला लागतील तेव्हा सिमेंट बंधारा, शेततळे नाल्यातील पाण्यामुळे पिकांना नवसंजिवनी मिळाली.
जलयुक्त शिवार अभियानात २०१५-१६ मध्ये २१४ गावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ११५ गावांमध्ये १०० टक्के काम पूर्ण झाले आहे तर ४४ गावांमध्ये ८० टक्के पेक्षा जास्त काम झाले आहे. या १५९ गावांमधील शेतकऱ्यांनी खंड काळात नाल्यामध्ये व सिमेंट बंधाऱ्यामुळे साठलेल्या पाण्याचा उपयोग ओलीत करून पिके वाचविण्यासाठी केला.
यावर्षी जिल्ह्यातील किमान २५ हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांना तरी पावसाच्या लहरीपणाचा फटका बसणार नाही. याशिवाय नाला खोलीकरण आणि सिमेंट नाला बांधमुळे विहिरीच्या पाणी पातळीत दीड ते दोन मिटरने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना पावसाच्या खंड काळात तसेच रब्बी पिकासाठी होणार आहे.(प्रतिनिधी)

३,२०६ पैकी २,८९६ कामे पूर्ण
गतवर्षी २१४ गावांमध्ये ३,२०६ कामे घेण्यात आली होती. यापैकी २,८९६ कामे पूर्ण झाली आहेत. या सर्व कामांमुळे जिल्ह्यात ३७ हजार ४५९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठी निर्माण झाला आहे. या पाण्याचा उपयोग कापूस पिकासाठी एकदा पाणी दिल्यास २४ हजार ९७२ हेक्टर क्षेत्रात सिंचन होवू शकते. तर दोनदा पाणी वापरल्यास १२ हजार ४८६ हेक्टर सिंचन होवू शकते.

Web Title: Wardha is the top in the district division in the implementation of water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.