वर्धा: दुचाकी - एसटीची धडक; दोघे जागीच ठार
By अभिनय खोपडे | Updated: September 9, 2023 23:04 IST2023-09-09T23:03:07+5:302023-09-09T23:04:05+5:30
दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजता घडली.

वर्धा: दुचाकी - एसटीची धडक; दोघे जागीच ठार
आर्वी ( वर्धा ) :आर्वी येथील पॉलिटेक्निक कॉलेज समोर एसटी व दुचाकी धडक झाली या अपघातात दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजता घडली.
पुंजाराम डोमाजी भलावी रा. जामखुटा , दिनेश पवार रा. राजनी असे दोघे ठार झालेत असल्याचे सांगण्यात आले आहे. एम एच ४० वाय ५८७८ या क्रमांकाची बस आर्वी बस स्थानकातून अमरावतीला जाण्याकरिता ८:४५ वाजता निघाली तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी २७ एसी ४६६१ ने बसला धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी आणि पोलिसांनी लागलीच उपजिल्हा रुग्णालयात दोघांना दाखल केल असता डॉक्टरांनी मृत घोषित केले .