वर्धेचे पाणीसंकलन मॉड्युल पंतप्रधान आवास योजनेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 05:12 PM2017-08-11T17:12:46+5:302017-08-11T17:26:42+5:30
रूपेश खैरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान तारांकीत प्रश्नाद्वारे त्यांच्या पाणी संकलनाच्या मॉड्युलचे प्रात्याक्षिक दिले होते. या मॉड्युलचा अभ्यास करीत भूजल सर्वेक्षण विभागाने सर्व्हे करून अहवाल सादर केला. या अहवालात सदर मॉड्युल पाऊस पाणी संकलनाकरिता महत्त्वाचे सिद्ध झाल्याने त्याचा उपयोग पंतप्रधान आवास योजनेत होणार आहे.
वैद्यकीय जनजागृती मंचाचे डॉ. सचिन पावडे यांनी सादर केलेल्या या मॉड्युलच्या उपयुक्ततेचा सर्व्हे करण्याच्या सूचना राज्याच्या भूजल सर्वेक्षण विभागाला देण्यात आल्या होत्या. त्या सूचनेनुसार विभागाने केलेल्या सर्व्हेत वर्धेचे मॉड्युल घराच्या छतावर जमा होणाºया पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याकरिता यशस्वी ठरले. तसा अहवाल भूजल विभागाच्यावतीने मुख्यमंत्री कार्यालयाला दिला. या अहवालावरून मुख्यमंत्र्याच्या सचिवांनी या यंत्राचा वापर शासकीय करण्याच्या सूचना एका पत्राद्वारे नगरविकास विभागाला दिल्या आहेत.
या यंत्राच्या सहायाने केवळ छतावरील पाणीच जमिनीत मुरविणे नाही तर त्याची साठवण करून त्याचा वापर पिण्याकरिता उपयोगात आणणे सहज शक्य होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे वर्धेचे हे मॉड्युल उपयोगात आणल्यास मुख्यत्वे दुष्काळग्रस्त भागात लाखमोलाचे ठरेल व दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे दुर्भिक्ष कमी होईल, असेही मुख्यमंत्र्यांच्या सचिवाने पत्रात उल्लेखित केले आहे.
वापर करणाºयांना मालमत्ता करात सवलत
च्पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात सुरू असलेल्या घरकुलांच्या कामात या यंत्राचा वापर करण्याचे सुचविले आहे. यंत्र वापरणाºया ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा व महानगरपालिकांना मालमत्ता करात सवलत देण्यात येणार आहे.
छतावर साचणारे पावसाचे पाणी थेट विहिरीत किंवा बोअरमध्ये सोडणे शक्य आहे. या यंत्राच्या माध्यमातून पाण्याचा शंभर टक्के रिचार्ज शक्य आहे. असे यंत्र कोणी तयार करून नये म्हणून व्हीजेएमने त्याचे पेंटट ठेवले आहे. विशेष म्हणजे शासनाने पाऊस पाण्याच्या संकलनाकरिता निर्देषित केलेले हे देशातील एकमेव यंत्र आहे.
- डॉ. सचिन पावडे, अध्यक्ष, वैद्यकीय जनजागृती मंच वर्धा.