हिंगणघाट येथील घटनेच्या निषेधार्थ आज सर्व पक्षीय मोर्चा व वर्धा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 10:18 AM2020-02-06T10:18:02+5:302020-02-06T10:24:04+5:30

हिंगणघाट येथे  मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद देशभर उमटलेले आहेत.

Wardha woman set ablaze ‘very critical’: Locals hold protest march, demand exemplary punishment for accused | हिंगणघाट येथील घटनेच्या निषेधार्थ आज सर्व पक्षीय मोर्चा व वर्धा बंद

हिंगणघाट येथील घटनेच्या निषेधार्थ आज सर्व पक्षीय मोर्चा व वर्धा बंद

googlenewsNext

वर्धा - हिंगणघाट येथे  मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद देशभर उमटलेले आहेत. महाविद्यालयीन तरुणी, स्त्रिया यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी, पीडितेला व तिच्या कुटुंबियांना  न्याय मिळावा या मागण्यांकरिता वर्धा शहरात गुरुवारी (6 फेब्रुवारी) वर्धा बंद तसेच भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या करिता वर्धा जिल्ह्यातील समस्त राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेतलेला आहे. सदर मोर्चा हा सकाळी 11.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून सुरू होईल. 

मोर्चाचा मार्ग छत्रपती शिवाजी पुतळा मेन रोड मार्गे निर्मल बेकरी चौक ते अंबिका उपहार गृह चौक ते इतवारा रोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून समापन होईल. यात समस्त वर्धा जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातील तरुण तरुणी, शिक्षक शिक्षिका तसेच समस्त व्यापारी प्रतिष्ठान यांना सहभागी होऊन पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन वर्धा जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटनांनी केलेले आहे. वर्धा बंदचे आवाहन केवळ सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंतच केलेले आहे.

हिंगणघाटमधील नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर एका तरुण शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माथेफिरू तरुणाने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हिंगणघाट पीडितेला सरकारने मदतीचा हात दिला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. 'माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्यालाही जिवंत जाळा' असं म्हणत पीडित तरुणीच्या आईने संताप व्यक्त केला आहे. 

पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपीला पेट्रोल टाकून जाळा अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'मुलीची अवस्था बघवत नाही. ती हातवारे करून बोलण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्यालाही जिवंत जाळा. मुलालाही त्याच वेदना झाल्या पाहिजेत' असं पीडित तरुणीच्या आईने म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या शांतताप्रिय जिल्ह्याला सोमवारी हिंगणघाट येथील क्रूर घटनेने गालबोट लागले. महाविद्यालयात निघालेल्या 24 वर्षीय प्राध्यापक तरुणीला भर रस्त्यावर लोकांच्या समोरच पेट्रोल टाकून पेटवण्यात आले. या प्रकरणातील आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. 

भाजपाच्या चित्रा वाघ यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी सोमवारी (3 फेब्रुवारी) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. तरुणीला जाळण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच विकृतांना कायद्याची, पोलिसांची भीती उरलेली दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून आरोपीला कडक शासन तर पीडितेला न्याय मिळवून द्यावा असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 'जालन्याची घटना ताजी असतानाचं वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे सकाळी भर रस्त्यावर नांदोरी चौकात एका शिक्षिका असणाऱ्या युवतीला जिवंत जाळण्याचा गंभीर प्रकार घडलाय ज्यात युवती गंभीर जखमी झालेली आहे. राज्यात कायदा सुरक्षेचे धिंडवडे निघताना दिसताहेत' असं ट्विट त्यांनी केलं.

महत्त्वाच्या बातम्या 

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करणं ही मोदींची घातक चूक - इम्रान खान 

'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला मिळालं पहिलं दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया!

विचित्र अपघात; रनवेवर उतरताना विमानाचे तीन तुकडे झाले

महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा राज्यातही; आंध्रच्या ‘दिशा’चे अनुकरण

कर्जमाफीचा ३४ लाख शेतकऱ्यांना फायदा; लाभार्थींची नावे जाहीर करणार

 

Web Title: Wardha woman set ablaze ‘very critical’: Locals hold protest march, demand exemplary punishment for accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.