सायकल रॅलीत वर्धेकरांचा सहभाग
By admin | Published: March 16, 2016 08:38 AM2016-03-16T08:38:24+5:302016-03-16T08:38:24+5:30
ब्रेव्ह-हार्ट पॅडलर क्लबच्या वतीने रविवारी सायकल रॅली काढण्यात आली. या स्पर्धात्मक रॅलीतून शारीरिक व मानसिक
वर्धा : ब्रेव्ह-हार्ट पॅडलर क्लबच्या वतीने रविवारी सायकल रॅली काढण्यात आली. या स्पर्धात्मक रॅलीतून शारीरिक व मानसिक स्वास्थाचा संदेश देण्यात आला. रॅलीत वर्धेकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
डॉ. नितीन भलमे, डॉ. नितीन मेशकर, डॉ. प्रवीण सातपुते, डॉ. अभिजित खणके, डॉ. वैभव पाटणी, संजय दुरतकर, अंकीत जयस्वाल, डॉ. अश्विनी कलंत्री आदींच्या सहभागातून ब्रेव्ह-हार्ट पॅडलर क्लबची स्थापना केली आहे. सायकल चालविणे आरोग्यासाठी अत्यावश्यक असल्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या डॉक्टर मंडळींनी विविध संस्थेद्वारे आयोजित सायकल रॅलीत सहभागी होऊन २०० किलोमीटर पेक्षा जास्त सायकलदौड १२ तासात पूर्ण केली आहे. सायकालचा जास्तीत जास्त वआपर करण्याचा प्रचार, प्रसार करून वर्ध्यातील सायकलप्रेमींना एकत्रित आणण्याकरिता सायकल रॅली काढण्यात आली.
रॅलीच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इलमे यांनी सहभाग नोंदविला होता. निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. २० आणि ४० किलोमिटर अंतराची ही सायकल दौड होती.
स्पर्धेच्या आयोजनाकरिता वर्धा सायकल क्लब, बहार नेचर फाऊंडेशन, एमआर असोसिएशन, सावंगी मेडीकल कॉलेज, पिपरी तंत्रनिकेतन यासारख्या संस्थांनी सहभाग नोंदविला होता. याशिवाय शहरातील २० महिलांनीही सहभागी झाल्या होत्या.(शहर प्रतिनिधी)