कोसळधारेने वर्धामाई वाहतेय ओसंडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 05:00 AM2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:00:07+5:30

देऊरवाडा-कौंडण्यपूर येथे मोठया प्रमाणात वर्धा नदीचे बॅकवॉटर जमा होते. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . वर्धा नदीवरील आर्वी ते अमरावती मार्गावरील वाहतूक पुरामुळे ठप्प झाली आहे. संततधार अशीच कायम राहिल्यास आणखी काही दिवस वाहतूक ठप्प राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

Wardhamai is flowing with a torrential downpour | कोसळधारेने वर्धामाई वाहतेय ओसंडून

कोसळधारेने वर्धामाई वाहतेय ओसंडून

Next
ठळक मुद्देआर्वी-अमरावती मार्ग बंद । अप्पर वर्धाच्या ३३ दारांतून पाण्याचा विसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : कोसळधारेमुळे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील देऊरवाडा-कौंडण्यपूर पुलावरून वर्धा नदीचे पाणी दुथडी भरून वाहत आहे. याकरिता आर्वी-अमरावती मार्ग बंद करण्यात आला असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आर्वी परिसरात मागील ३६ तासांपासून संततधार सुरू आहे. वर्धा नदीच्या वरील बाजूला अप्पर वर्धा धरण (नलदमयंती) तर खालील बाजूस निम्न वर्धा धरण (बगाजी सागर) धरण आहे. अप्पर वर्धा धरणात संचयित झालेले पाणी वर्धा नदीपात्रात सोडले जाते. सध्या अप्पर वर्धाच्या तेरा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर आर्वी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणातून ३३ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे
देऊरवाडा-कौंडण्यपूर येथे मोठया प्रमाणात वर्धा नदीचे बॅकवॉटर जमा होते. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . वर्धा नदीवरील आर्वी ते अमरावती मार्गावरील वाहतूक पुरामुळे ठप्प झाली आहे. संततधार अशीच कायम राहिल्यास आणखी काही दिवस वाहतूक ठप्प राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
निम्न वर्धा धरणाची पूर्ण दारे उघडण्यात आली असून या ३१ दारातून १.३ मीटर एकूण सिसर्ग घन मीटर प्रतिसेकंद ३ हजार ४६६ क्युसेक्स पाणी वर्धा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी निम्न वर्धा धरणाच्या ३१ दारांतून ३० सेंटीमीटरने पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने वर्धा नदी काठावरील धनोडी बहाद्दरपूर, वडगाव (पांडे), दिघी (होणाडे) सायखेडा, देऊरवाडा आदी एकूण २३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती निम्न वर्धा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता पवन पांढरे धनोडी यांनी दिली.

बोरचे तीन दरवाजे ३० सेंमीने उघडले
सेलू -सध्या बोरधरण ९०.८१ टक्के भरले आहे. धरणातून शनिवारी दुपारी ४ वाजता ३ दरवाजे ३० सेंमी उघडून ६६ क्युसेक्स पाणी बोर नदीपात्रात सोडण्यात आले. नदीकाठावरील गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा पाणी सोडण्याची वेळ आली आहे. बोरधरणाचा एकूण जलसाठा १२३.२१२ दलघमी आहे. शनिवारी पाणी पातळी ३१९.५२ मीटर व साठा १११.८८३५ दलघमी असा साठा ९०.८१ टक्के आहे. धरणाचे परिचलन आराखड्यानुसार बोर प्रकल्पातून ३ दरवाजे ३० सेंमीने उघडून त्यामधून ६६ क्युसेक पाणी बोरनदीपात्रात सोडण्यात आले. पातळीत वाढ झाल्याने कितीही वेळा धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात येऊ शकते, असे उपविभागीय अभियंता भालेराव यांनी म्हटले असून सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे.

Web Title: Wardhamai is flowing with a torrential downpour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.