वर्धेचा दहावीचा निकाल ८०.१२ टक्के

By admin | Published: June 13, 2017 03:53 PM2017-06-13T15:53:35+5:302017-06-13T15:53:46+5:30

माध्यमिक शालांत परीक्षेचा वर्धा जिल्ह्याचा निकाल ८०.१२ टक्के लागला. यंदाच्या सत्रात एकूण १५ हजार १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले

Wardha's Class X results for 80.12 percent | वर्धेचा दहावीचा निकाल ८०.१२ टक्के

वर्धेचा दहावीचा निकाल ८०.१२ टक्के

Next

ऑनलाइन लोकमत

वर्धा, दि. 13 -  माध्यमिक शालांत परीक्षेचा वर्धा जिल्ह्याचा निकाल ८०.१२ टक्के लागला.  यंदाच्या सत्रात एकूण १५ हजार १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ७ हजार ७०४ मुले असून त्यांची टक्केवारी ७४.६७ टक्के आहे. तर ७ हजार ७२४ मुली असून, त्यांची टक्केवारी ८६.१५ एवढी आहे. या निकालातही मुलींनीच आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. 
वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यात माध्यमिक शिक्षण देणाºया एकूण २४७ शाळा आहेत. त्या शाळांमधून एकूण १८ हजार ९४८ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. यात ९ हजार ९५९ मुले आणि ८ हजार ९८९ मुली समावेश होता. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ९ हजार ९२० मुले आणि ९ हजार ९६६ मुलींनी परीक्षा दिली. 
जिल्ह्यात वर्धा तालुक्याचा लागला असून त्याची टक्केवारी ८३.४२ टक्के आहे. तर सर्वात कमी निकाल सेलू तालुक्याचा असून त्याची टक्केवारी ७५.८५ टक्के लागला आहे. या व्यतिरिक्त आर्वी तालुक्याचा निकाल ७८.१२ टक्के, आष्टी (शहीद) ७६.९५, देवळी ८०.३२, हिंगणघाट ८१.३५, कारंजा (घाडगे) ७४.७८ तर समुद्रपूर तालुक्याचा निकाल ७९.७९ टक्के लागला. 
जिल्ह्यातील १९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून आठ शाळांचा निकाल ३६ टक्क्यांच्या आत आहे.

Web Title: Wardha's Class X results for 80.12 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.