वर्धेकरांनो सावधान! शनिवार ठरला ‘हॉट डे’; पारा@ ४४.१ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2023 08:16 PM2023-05-13T20:16:02+5:302023-05-13T20:16:28+5:30

Wardha News जिल्ह्यात पुढील काही दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्या अनुषंगाने शनिवार हा दिवस सर्वाधिक हॉट ठरला आहे.

Wardhekars beware! Saturday turned out to be a 'hot day'; Mercury @ 44.1 | वर्धेकरांनो सावधान! शनिवार ठरला ‘हॉट डे’; पारा@ ४४.१ 

वर्धेकरांनो सावधान! शनिवार ठरला ‘हॉट डे’; पारा@ ४४.१ 

googlenewsNext

वर्धा : जिल्ह्यात पुढील काही दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्या अनुषंगाने शनिवार हा दिवस सर्वाधिक हॉट ठरला आहे. शनिवारचे तापमान ४४.१ अंश नोंदविण्यात आले आहे. उष्णतेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. वर्धा शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट पसरली असून तापमानात पुढील काही दिवस मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला आहे.

तहान लागलेली नसली तरीदेखील जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाणाऱ्यांनी गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चप्पलचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबुपाणी, ताक इत्यादीचा वापर करावा.

अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करीत असताना मधे ब्रेक घेऊन नियमित आराम करावा.

गरोदर, कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावे. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.

काय करू नये : लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२ ते ३:३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेरील तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Web Title: Wardhekars beware! Saturday turned out to be a 'hot day'; Mercury @ 44.1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान