पाणी बचतीच्या संदेशासाठी वर्धेकर रस्त्यावर
By Admin | Published: March 21, 2016 01:52 AM2016-03-21T01:52:54+5:302016-03-21T01:52:54+5:30
पाणी हेच जीवन, पाण्याचा वापर जपून करा, पाण्याची बचत करा... जल है तो कल है... आदी घोषणा देत डॉ. बाबासाहेब
वर्धा : पाणी हेच जीवन, पाण्याचा वापर जपून करा, पाण्याची बचत करा... जल है तो कल है... आदी घोषणा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत जलजागृती सप्ताहानिमित्त रॅली काढून पदयात्रेतून वर्धेकरांना संदेश देण्यात आला. या पदयात्रेला खा. रामदास तडस यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी त्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. पदयात्रेचा समारोप आ. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत झाला.
जलसंपदा विभागामार्फत वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खा. रामदास तडस यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करून पदयात्रेला झेंडी दाखविली. पदयात्रेत भजनी मंडळासह, जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांची सहभागी झाले होते.
१६ ते २२ मार्चपर्यंत साजरा करण्यात येत असलेल्या जलजागृती सप्ताहानिमित्त पदयात्रेतून पाणी बचतीचा संदेश लोकापर्यंत पोहचावा, पाण्याची बचत व्हावी, या उद्देशाने शहरातून पदयात्रा काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून बजाज चौक, शिवाजी चौक मार्गे निघालेल्या पदयात्रेचा समारोप आ. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी चौकात झाला.
प्रारंभी खा. रामदास तडस यांचा वृक्ष देऊन जलसंपदा विभागामार्फत सत्कार करण्यात आला. या पदयात्रेला जिल्हा पोलीस उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, सामाजिक कार्यकर्ते रमेश केला, लॉयन्स क्लबचे अभिषेक बेद, अनिल नरेडी, ओमकार गावंडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, कार्यकारी अभियंता शंकर मंडवार, अमित मेश्राम, दत्तात्रय रब्बेवार, ढवळे, उपकार्यकारी अभियंता विजय नाखले, सुनील दोशी, देशमुख, सहायक अभियंता राजू बोडेकर, गणेश गोडे, लेखाधिकारी प्रदीप शेंदरे, इमरान राही, इरफान शेख, सुहास पाटील आदींची उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार रब्बेवार यांनी मानले.