वारकरी संस्कार शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:08 AM2018-04-21T00:08:02+5:302018-04-21T00:08:02+5:30
श्री संत भानुदास महाराज संस्था आणि मानवता धर्म समिती, वर्धमनेरी यांच्यावतीने सांप्रदायिक वारकरी संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आहे. या शिबिरात शिबिरार्थ्यांना विविध विषयांचे तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : श्री संत भानुदास महाराज संस्था आणि मानवता धर्म समिती, वर्धमनेरी यांच्यावतीने सांप्रदायिक वारकरी संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आहे. या शिबिरात शिबिरार्थ्यांना विविध विषयांचे तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करीत आहे. विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक तसेच मानवतेचा संस्कार रूजवा हा या शिबिराचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. शिबिराचे यंदाचे हे पंधरावे वर्ष आहे.
सदर शिबिरात आध्यात्मिक प्रबोधनासोबत कीर्तन, प्रवचन, मृदुंग, टाळ, पावल्या, भारूड, योगासन, प्राणायाम आदी विषयांची माहिती दिल्या जात आहे. आतापर्यंत शिबिरात शिबिरार्थ्यांना भानुदास महाराज, ज्ञानेश्वर तायडे महाराज, हरिदास निमकर, डॉ. प्रमोद जाणे, अविनाश चरडे, चंद्रकांत पोद्दार यांनी मार्गदर्शन केले.
सदर शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे एक हजार मुलांना वाकरी विषयाला अनुसरून शिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी बहूतांश विद्यार्थी समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. शिबीरातून संस्कारातील व परितर्वनशील खरा माणूस घडविण्याचे कार्य होत आहे. इतकेच नव्हे तर ते काळाची गरज असल्याचे यावेळी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ज्ञानेश्वर तायडे महाराज, शेगावकर, जाधव महाराज, आळंदीकर, लहू आळंदीकर महाराज, डॉ. अरूण वाळके महाराज, आळंदीकर, विष्णू गवंडकर महाराज, पंढरपूरकर, विष्णू गोडे महाराज, संजय पाचपोर महाराज, डॉ. शांताराम बुटे, डॉ. चांदे, रामटेक, पाटील आदींचे सहकार्य लाभले. या शिबिरातून बालमनावर योग्य संस्कार केले जात आहेत.