‘त्या’ सात बालकांना केले पालकांच्या स्वाधीन

By admin | Published: May 3, 2017 12:34 AM2017-05-03T00:34:09+5:302017-05-03T00:34:09+5:30

झारखंड येथून पालकांना कुठलीही कल्पना नसताना सुरत येथे बालमजुरीकरिता नेणाऱ्याला वर्धा रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले घेतले होते.

'That' was made to the seven children who were released to their parents | ‘त्या’ सात बालकांना केले पालकांच्या स्वाधीन

‘त्या’ सात बालकांना केले पालकांच्या स्वाधीन

Next

 बालमजुरीकरिता नेताना रेल्वे पोलिसांनी पकडले
वर्धा : झारखंड येथून पालकांना कुठलीही कल्पना नसताना सुरत येथे बालमजुरीकरिता नेणाऱ्याला वर्धा रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले घेतले होते. यावेळी त्याच्या तावडीतून सात बालकांना सोडविण्यात आले होते. त्या बालकांना मंगळवारी बाल कल्याण समितीने त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी ताब्यातील या अल्पवयीन मुलांना मनोज तुरी याने २ हजार रुपये महिना पगार देतो म्हणून बरमरियावरुन सुरतला नेतो असे सांगितले. चौकशी दरत्यान प्रकार उघड झाल्याने प्रवासादरम्यान या बालकांना मनोज तुरी याला मुलांची तस्करी करण्याच्या आरोपात रेल्वे पोलिसांनी अटक केली.
काळजी व संरक्षणांतर्गत या सातही मुलांना बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिले. सातही मुलांचे समितीने बयान नोंदवून शासकीय मुलांचे वरिष्ठ बालगृह केळकरवाडी येथे ठेवले. येथून त्यांच्या पालकांशी संपर्क साधत त्यांना पालकांच्या स्वाधीन केले; परंतु घरच्या दारिद्रयामुळे पालकांनी चार मुलांना पुन्हा मनोज तुुरीनेच्या ताब्यात दिले तर तीन मुलांचे वडिल दारिद्रामुळे बंगलोर येथे मजुरीच्या कामावर गेले होते. त्यांना आपले मुले कोणाच्या ताब्यात दिले याची जाणीव नव्हती व कुठे नेणार आहे याचीही माहिती नव्हती.
पोलिसांनी कौशल्याने मुलांना वर्धा येथे ताब्यात घेतले व बाल कल्याण समितीने प्रयत्न करुन पालकांशी संवाद साधत मुलांना त्यांचा पालकांच्या ताब्यात दिले. सध्या आरोपी मनोज तुरी पोलीस कोठडीत असून त्याला पुढील तपासाकरिता झारखंड येथे सोपविण्यात येणार असल्याची माहिती आहे. यावेळी समितीच्या अध्यक्ष संगिता धनाड्य, सदस्य अजय भोयर, शांता पावडे यांची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)
 

Web Title: 'That' was made to the seven children who were released to their parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.