पारधी बेड्यावर ‘वॉश आऊट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:10 PM2019-07-23T22:10:17+5:302019-07-23T22:12:17+5:30
नजीकच्या शिवणी पारधी बेड्यावर गावठी दारू गाठून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच समुद्रपूर पोलिसांच्या चमूने मंगळवारी शिवणी पारधी बेड्यावर छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : नजीकच्या शिवणी पारधी बेड्यावर गावठी दारू गाठून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच समुद्रपूर पोलिसांच्या चमूने मंगळवारी शिवणी पारधी बेड्यावर छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी कच्चा मोहरसायन सडवा व गावठी मोह दारू तसेच दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण १.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
या मोहिमेदरम्यान समुद्रपूर पोलिसांनी शिवणी पारधी बेडा परिसरात जमिनीत लपवून ठेवलेल्या मोह रसायन सडव्याचा शोध घेऊन तो नष्ट केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सहा लोखंडी ड्रम, १२ प्लास्टिकचे ड्रम तसेच २,४०० लिटर मोह रसायन सडवा तसेच ३० प्लास्टिक कॅनमधील ६०० लिटर गावठी मोह दारू असा एकूण १ लाख ९१ हजार ८०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार हेमंत चांदेवार, करूणा मुसळे, अरविंद येनुरकर, रवी पुरोहीत, आशिष गेडाम, वैभव चरडे, नितेश मैदपवार, निरज वैरागडे, प्रमोद जाधव, आशिष कांबळे, अजय वानखेडे यांनी केली.