आश्रमातील कॅमेऱ्यांचा सर्वांवर ‘वॉच’

By admin | Published: July 7, 2016 02:13 AM2016-07-07T02:13:19+5:302016-07-07T02:13:19+5:30

जगप्रसिद्ध गांधी आश्रमात सीसीटीव्ही कॅमेरे सर्वांवर वॉच ठेवण्याचे काम करीत आहे. सर्व कॅमेरे सुरू असून

'Watch' for all the ashram cameras | आश्रमातील कॅमेऱ्यांचा सर्वांवर ‘वॉच’

आश्रमातील कॅमेऱ्यांचा सर्वांवर ‘वॉच’

Next

आॅनलाईनची व्यवस्था : पावसाळ्यातही संरक्षित व कार्यरत
सेवाग्राम : जगप्रसिद्ध गांधी आश्रमात सीसीटीव्ही कॅमेरे सर्वांवर वॉच ठेवण्याचे काम करीत आहे. सर्व कॅमेरे सुरू असून पावसाळ्यातही ग्लास आणि झडपचे संरक्षण कॅमेऱ्यांना देण्यात आल्याने ते सुरक्षित आहेत.
खासदार निधीतून आठ महिन्यांपूर्वी आश्रम प्रतिष्ठानच्या पाठपुराव्यामुळे ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. आश्रमतातील बापूकुटीतून संग्रहित बापूंचा चष्मा चोरीला गेला. प्रकरणाचा तपास सुरू असला तरी ऐतिहासिक ठेवा आश्रमातून गेल्याने प्रशासन व व्यवस्थापकांसाठी चिंतेचा विषय होता. वर्तमान व भविष्याचा विचार करता नवीन अध्यक्ष व मंत्र्यांनी पाठपुरावा करून कॅमेऱ्याची व्यवस्था आश्रमात करून घेतली. नवीन तंत्रज्ञानाचा फायदा आश्रमाला होत असल्याचे दिसते. कॅमेरे आश्रम व नई तालीम समितीचे प्रवेशद्वार, कार्यालय, आश्रम परिसर, आदी निवास, बा व बापू कुटी, आखरी निवास, परचुरे शास्त्री कुटी, रसोडा, आद्य आदी निवास, गोशाळा आदी ठिकाणी लावण्यात आले आहे.
३० कॅमेरे सुरू असून १५-२० दिवसांत ते रीस्टार्ट केले जातात. कॅमेरे वॉटर प्रुफ ग्लास असून वर छोटी झडप असल्याने पावसापासून संरक्षित आहे. एक मॉनिटर रूममध्ये ठेवले आहे. नियमित पाहण्याची जबाबदारी मिथून हरडे यांच्या आहे. आॅनलाईनची व्यवस्था असल्याने युजर आयडी व पासवर्डवरून आश्रमवर नजर ठेवता येते वा पाहता येते. ही व्यवस्था व्यवस्थापन व प्रशासकीय दृष्ट्या उत्तम असल्याचे अधीक्षक भावेश चव्हाण यांनी सांगितले. आश्रमात सर्व प्रकारचे लोक येतात. सर्वत्र कॅमेरे असल्याने एकाच वेळी लक्ष ठेवता येते. आद्य आदी निवास व परचुरे शास्त्री कुटी येथे युवक -युवतींचा धुडगूस असतो. अशांना त्वरित समज दिली जाते. मार्गदर्शिका, सुरक्षा रक्षक, कर्मचारी सर्वांचे सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे आश्रमातील अन्य प्रकारही बंद झाले आहेत.(वार्ताहर)

Web Title: 'Watch' for all the ashram cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.