पाण्याने सर्वांच्याच डोळ्यात आणले ‘पाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:53 PM2019-06-12T23:53:38+5:302019-06-12T23:53:57+5:30

जिल्ह्यात यंदा जलसंकट तीव्र झाले आहे. यामुळे सर्वत्र नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा पाहायला मिळत आहे. पाण्याणे यंदा नागरिकांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले आहे. पाणीसंकट आणि उष्णतामानामुळे वैतागलेल्या नागरिकांना आता धो-धो पावसाची प्रतीक्षा आहे.

Water brought 'water' to everyone's eyes | पाण्याने सर्वांच्याच डोळ्यात आणले ‘पाणी’

पाण्याने सर्वांच्याच डोळ्यात आणले ‘पाणी’

Next
ठळक मुद्देधो-धो पावसाची प्रतीक्षा : प्रखर उष्णतामान अद्याप कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात यंदा जलसंकट तीव्र झाले आहे. यामुळे सर्वत्र नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा पाहायला मिळत आहे. पाण्याणे यंदा नागरिकांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले आहे. पाणीसंकट आणि उष्णतामानामुळे वैतागलेल्या नागरिकांना आता धो-धो पावसाची प्रतीक्षा आहे.
गतवर्षी जिल्ह्याचे अत्यल्प पाऊस झाला. यामुळे जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा होऊ शकला. शहराला पाणीुरवठा करणाऱ्या धाम व महाकाळी धारणात अल्पसा जलसाठा आहे. तर शहरालगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाºया येळाकेळी येथील नदीपात्रानेही तळ गाठला आहे. परिणामी, सद्यस्थितीत शहर आणि ग्रामीण भागाला सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात शेतशिवारात उन्हाळवाहीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
मृग नक्षत्राला सुरुवात होऊन चार दिवस झाले आहेत. मृग नक्षत्रापूर्वी आलेल्या वादळी पावसाने ज्ञनेक ग्रामीण भागांना तडाखा दिला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. वीज पडल्याने जनावरे मृत्युमुखी पडली. आता तीन दिवसांपासून प्रखर उष्णतामान असून उकाडा कायम आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई असल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. शहरात आणि ग्रामीण भागात पाण्याचे खासगी टँकर सुरू आहेत.
मात्र, किती दिवस पाणी विकत घ्यायचे, हा प्रश्न नागरिकांंना भेङसावत आहे. जलाशयांमध्ये २० जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. दुसरीकडे पावसाचा मागील तीन ते चार दिवसांपासून पत्ता नाही. त्यामुळे सर्वच जण चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. दररोज सायंकाळी आकाशात मेघ दाटून येत असले तरी पाऊस मात्र येत नाही. त्यामुळे पाणीसमस्या आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. दिवसेंदिवस उकाडाही असह्य होऊ लागला आहे. त्यामुळे जो-तो पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Water brought 'water' to everyone's eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.